Breaking

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२

कोल्हापूर पोलिसांची जबरदस्त कामगिरी ६०० बॉक्स दारुसह जवळपास ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

 



कोल्हापूर : दिनांक ९ सप्टेंबर रोजी बांदा गावच्या हद्दीत, गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे अंर्तगत छापा घालून अवैध मद्याची वाहतूक करणारी आयशर गाडी पकडण्यात आली. ज्यामधे भारतीय बनावटीचे विदेशी दारूचे ६०० बॉक्स होते.

          फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेले भारतीय बनावटीचे विदेशी मद्याचे विविध ब्रॅन्डच्या ६०० बॉक्स  तसेच आयशर कंपनीचा सहाचाकी टॅम्पो असा एकूण पंचावन्न लाख बेचाळीस हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपित इसम संजय मारूती गवस वय वर्ष 42 राहणार वाफोली, ता. सावंतवाडी यास अटक करण्यात आली आहे.

      सदरची कारवाई मा.आउक्त राज्य उत्पादन शुल्क, श्री.कांतीलाल उमापसो यांचे आदेशानुसार मा.संचालक श्री.सुनील चव्हाणसो यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर या पथकाने मा. विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर श्री. बी. एच. तडवीसो, यांचे आदेशाने निरीक्षक श्री. एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक श्री. आर. जी. येवलुजे, दुय्यम निरीक्षक श्री. एस. एस. गोंदकर व कॉन्स्टेबल सर्वश्री सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दिपक कापसे यांनी केली.

पुढील तपास श्री. एस. एस. गोंदकर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा