![]() |
डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूर |
*विक्रांत माळी : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगला एम. सी. ए. व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ साठी सुविधा केंद्राची महाराष्ट्र शासनाकडून मान्यता मिळाली अशी माहिती महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्र.प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांनी दिली.
सन २०२२ - २३ मध्ये होणाऱ्या एम.सी.ए,प्रथम वर्ष अभियांत्रिकी, द्वितीय वर्ष व पदव्युत्तर अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ.जे. जे.मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र मान्यता मिळाली आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना या केंद्रातून आपले नाव नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज भरता येतील. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मार्गदर्शन करणे,इंटरनेट द्वारे फॉर्म भरणे यासाठी एका विशिष्ट टीमची योजना करण्यात आलेली आहे.
जयसिंगपूर व परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्था प्रशासनाकडून करण्यात आले.सुसज्ज इंटरनेट सेवा, वायफाय सुविधा,कॉलेज परिसरामध्ये ए.टी.एम व झेरॉक्स ची सुविधा उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना फॉर्म भरणेसाठी सोयीचे होणार आहे. तरी उपलब्ध सुविधाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी माहिती रजिस्ट्रार प्रा.एस.टी. जाधव यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा