Breaking

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

थोर स्वातंत्र्य सैनिक आणि प्रतिसरकारचे सेनानी क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त शनिवारी समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी येथे जाहीर व्याख्यान

क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड



      इचलकरंजी :  थोर स्वातंत्र्य सैनिक आणि प्रतिसरकारचे सेनानी क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी यांच्या वतीने शनिवार दिनांक.१७ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता समाजवादी प्रबोधिनी हॉल,इचलकरंजी येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. " क्रांतीअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांचे विचार आणि वर्तमान " या विषयावर ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.बाबुराव गुरव (तासगाव )हे प्रमुख वक्ते म्हणून मांडणी करणार आहेत. अध्यक्षस्थानी पदवीधर मतदार संघाचे आमदार अरुणअण्णा लाड हे आहेत. तरी या व्याख्यानाला सर्व जिज्ञासू नागरिक बंधू-भगिनीने उपस्थित रहावे असे आवाहन समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.


स्थळ - समाजवादी प्रबोधिनी हॉल, इचलकरंजी 

वेळ - शनिवार सायंकाळी ६ वाजता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा