टाकळीवाडी :- शिरोळ, टाकळीवाडी येथील माजी सुभेदार केंदबा कांबळे यांची महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. के. कांबळे हे हे भारतीय लष्करात 26 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहेत.
आपल्या मनोगतात बोलताना त्यांनी 'देश सेवा झाली आता समाजसेवा करणार व इथून पुढे निस्वार्थपणे व प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली.
निवड समितीचे अध्यक्ष सरपंच मंगल बिरणगे यांच्या उपस्थितीत निवड झाली. यावेळी कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे अमित पाटील ,ग्राम पोलीस पाटील सौ सुनीता पाटील, उपसरपंच बाजीराव गोरे, ग्रामसेवक एन .एच.मुल्ला, अनिल कांबळे, विनायक कांबळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य ,समस्त गावकरी उपस्थित होते. ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा