
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळ व परिषदेच्या निवडणुका खूप विलंबानंतर अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व घटकांच्या मध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम २८(२)(०) अन्वये दहा प्राचार्य, कलम २८ (२) (p) अन्वये सहा व्यवस्थापन प्रतिनिधी, कलम २८(२)(r) अन्वये दहा महाविद्यालयीन अध्यापक, कलम २८ (२)(s) अन्वये तीन विद्यापीठ अध्यापक आणि कलम २८ (२)(t) अन्वये दहा नोंदणीकृत पदवीधर अधिसभेवर, तर कलम ३२ (३) (g) अन्वये विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापकांमधून आठ अध्यापक विद्यापरिषदेवर तसेच प्रत्येक अभ्यास मंडळावर कलम ४०(२)(c) अन्वये तीन महाविद्यालयीन विभागप्रमुख या निवडणूकीद्वारे भरण्यात येणाऱ्या जागांसाठी दिनांक १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूकीचे वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा