Breaking

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

शिरोळ : लंपी विषाणूसाठी शासन व भाजपा युवा मोर्चा कडून फिरत्या गाईंसाठी लसीकरण मोहीम



*राहुल घाटगे  : विशेष प्रतिनिधी*


 शिरोळ : सध्या कोल्हापूर जिल्ह्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनावरांना लम्पी आजाराने त्रस्त केले आहे. यामध्ये अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुधन, रोगाला बळी पडत चालल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा ( कोल्हापूर ग्रामिण ) कडून शासनाच्या मदतीने शिरोळ तालुक्यातील जनावरांच्या लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे.

       दरम्यान, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड परिसरातील फिरत्या 314 गाईंचे लसीकरण करून रोगाचा प्रसार व संसर्ग रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात लम्पी या आजारामुळे आत्तापर्यंत सात जनावरांचा मृत्यू झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढल्यामुळे भाजपा युवा मोर्चाने शासनाच्या मदतीने गाव स्तरावर लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये शिरोळ तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद, खाजगी पशुवैद्यक, गोकुळ संघाच्या पशुवैद्यकीय विभागाने मोलाचे सहकार्य केल्याचे यादव यांनी सांगितले.

      लसीकरण मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा दूध ( गोकूळ ) उत्पादक संघाकडून डॉ. संदीप ताटे,डॉ. शिव गंगोलवार, डॉ. तानाजी पाटील, शासनातर्फे डॉ. प्रकाश पाटील, डॉ. समीर पाटील आणि डॉ. आदेश गावडे यांनी मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तर शहराध्यक्ष ओंकार गावडे, पंकज गुरव, विश्वनाथ शिंदे, विजय आरगे, अभय गुरव ,महेश भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोहिमेत सहभाग घेतला होता.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा