![]() |
26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकांत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूरची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन प्रा.के.बी.पाटील यांनी सभासदांना सन २०२२-२३ साठी १२% लाभांश व गृह कर्जाची व्याजदर मर्यादा ११% करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. डॉ. नितीश सावंत उपस्थित होते.
सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मा. चेअरमन प्रा.के.बी.पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतू स्पष्ट केला. यावेळी जयसिंगपूर कॉलेजचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पतसंस्थेचे संस्थापक संचालक मा.डॉ. सुभाष बाबुराव अडदंडे यांना डॉजे जे.मगदूम समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार संस्थेच्या वतीने प्रा. के.बी.पाटील व पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रा. पी. सी.पाटील यांचे हस्ते शाल,श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.
मा. प्रा. पी.सी.पाटील यांनी संस्थेच्या कामकाज व प्रगतशील कामगिरीविषयीची सकल माहिती दिली.डॉ. सुभाष अडदंडे यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून संस्थेची आर्थिक प्रगती व संस्थेच्या प्रगतीबाबतचे सकारात्मक सूचना केल्या.सन २०२२-२३ वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज पतसंस्थेचे व्यवस्थापक मा.राहुल पाटील यांनी उत्तम पद्धतीने पूर्ण केले. यावेळी पतसंस्थेचे तज्ञ संचालक मा. महावीर पाटील, मा. अभिजीत अडदंडे, प्रा.डॉ. सौ.व्ही. व्ही. चौगुले, प्रा.सौ.एम.एस.पाटील,मा. संजय चावरे, मा.प्रदिप सुतार, मा.सुहास हिरुकडे, मा.सुनील कणसे व मा.हिरालाल पवार उपस्थित होते.
संचालक प्रा.आर.एम.मिश्रीकोटकर यांनी मनोगत व्यक्त करून या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन मानले. तर या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.बाळगोंडा पाटील यांनी केले. २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस पतसंस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सभा अत्यंत खेळीमेळीत संपन्न झाली.यासाठी सुधाकर पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा