Breaking

गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२

*सामाजिक कार्याने झपाटलेला व्यक्तिमत्व मा. शुक्राचार्य उर्फ बंडू ऊरूणकर


शुक्राचार्य उर्फ बंडू उरुणकर

    जयसिंगपूरात सामाजिक कामात अग्रेसर असणारे शुक्राचार्य उरूणकर अर्थात बंडू या नावाने सर्वांना सुपरिचित आहेत. बाबा आमटे आणि डॉ.महावीर  अक्कोळे यांच्या कार्याचा वसा आणि वारसा घेऊन, सामाजिक ध्येय निश्चित करून त्या अनुषंगाने आपल्या सामाजिक कामाचा झपाटा सुरू ठेवला आहे. विद्यार्थिदशेपासून डॉ.महावीर अक्कोळे यांच्याकडून मिळालेले सामाजिक कामाचे बालसंस्कार आणि पुढे त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्याबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांची सेवा करण्यात समाधान मानणारे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.

        बंडू उरुणकर हे एक तरुण व्यक्तिमत्व परंतु कमी वयात आलेली वैचारिक परिपक्वता व नसानसात असलेला सामाजिक संवेदनशीलता हे एखाद्या समाजसुधारका प्रमाणे आहे. मुळात बालपणापासून सुरू असलेल्या आर्थिक व सामाजिक संघर्षाचा प्रवास त्यावर मात करीत गरिबी दूर करण्याचा प्रयत्न आजतागायत सुरू आहे. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःच्या वेतना मधील काही रक्कम बाजूला ठेवून समाजातील वंचित,गरीब व गरजू घटकांसाठी त्याचा वापर करणे हा त्यांचा नित्यक्रम बनलेला आहे. मुळात एका बाजूला स्वार्थाने बरबटलेल्या या जग आणि दुसऱ्या बाजूला स्वतःची आर्थिक कुवत नसतानाही सामाजिक संवेदनशीलतेपोटी दुसऱ्याला मदत करणे हे मोठं काम बंडू ऊरुणकर यांच्या माध्यमातून होत आहे. गरीबी असतानाही दुसऱ्याला दान करण्याची आर्थिक व रक्तदानाच्या माध्यमातून असलेली दानत दिसून येते.

      सन २०१३ मध्ये आपल्या कामाला एखादा संस्थात्मक रूप यावं यासाठी डॉ. महावीर अक्कोळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'कवडसा फाउंडेशन,जयसिंगपूर या सेवाभावी संस्थेची स्थापना करून त्यांनी आपल्या सामाजिक कामाचा पसारा वाढविला.सन २०१९ पासून फॉर्च्यून शहा यांनी केलेल्या आर्थिक  मदतीच्या माध्यमातून रुग्ण सेवा साहित्य केंद्राची स्थापना झाली. या केंद्राच्या माध्यमातून हजारो रुग्णांना त्यांनी रुग्णसेवा बहाल केलेली आहे.

        मा.ऊरणकर यांनी ९५ वेळा रक्तदान करून आजच्या समाजव्यवस्थेसमोर एक आदर्श नागरिक व रक्तदाता ही प्रतिमा निर्माण   केली आहे. आज तागायत त्यांनी ३७ वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा वस्तुपाठ निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांना मोफत कपडे  देणे, जंतकृमी नाशक औषध गोळ्यांचा मोफत वाटप करणे, वयोवृद्धांना आधारासाठी स्टिक देणे, एड्सग्रस्त मुलांना दिवाळी सणानिमित्त अल्पोपहार व कपड्यांची व्यवस्था करणे, वाढदिवसा निमित्त फळे वाटप, विविध स्पर्धांचे आयोजन करणे, संस्कार वर्गाच्या माध्यमातून मुलांना सुसंस्कृत करणे, मुलांना शिक्षण उपयोगी वस्तू व साहित्याचे वाटप करणे, वयोवृद्धांना आवश्यक वस्तू देणे इ. सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून समाज कल्याणाचे वृत्त त्यांनी स्वीकारले आहे.

     जयसिंगपूर शहरातील विविध सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून हिरीरीने सहभाग, समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अन्य सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अविरतपणे त्यांनी काम केले आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेली उदात्त सेवा वाखाणण्याजोगे आहे. समाजसेवा आणि बंडू उरुणकर हे समीकरण बनत चालले आहे.

       आज तागायत त्यांना असंख्य पुरस्कार प्राप्त झाले असून त्यापैकी शक्ती फाउंडेशन सांगली येथून समाजसेवा पुरस्कार, अविष्कार फाउंडेशन जयसिंगपूर येथून समाजरत्न पुरस्कार, भिमक्रांती सोशल फाउंडेशन हरोली पुरस्कार, सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल गौरवचिन्ह व असे असंख्य पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत.

     शुक्राचार्य ऊरूणकार यांनी आदर्श गणेशोत्सव मित्र मंडळ शाहूनगर संस्थापक असून कवडसा फाउंडेशन जयसिंगपूर अध्यक्ष म्हणून ते सक्रियपणे काम करीत आहेत. नामदेव सांस्कृतिक भवन जयसिंगपूर सुदर्शन चौक युवक मंडळ जयसिंगपूर, येसूवहिनी सावरकर बाल विद्यामंदिर शाहूनगर या संस्थेचे ते कार्यशील संचालक म्हणून काम करीत आहेत.

       नुकताच आपणास जयसिंगपूर नगरीचा पुरस्कार प्राप्त झाला. खऱ्या अर्थाने एका समाजोपयोगी व्यक्तिमत्वाचा सन्मान होत आहे हे या निमित्तानं नमूद करावे लागेल.


*आपणास वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन*

🌷🌷🌷🙏🌷🌷🌷🙏🌷🌷🌷

✍️ *प्रा. डॉ. प्रभाकर तानाजी माने*

*संपादक ,जय हिंद न्यूज नेटवर्क*

जयसिंगपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा