![]() |
शिरोळ पोलीस गुन्हे शोध पथकाची उत्तम कामगिरी |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
शिरोळ : तालुक्यातील नांदणी येथील येथील मोटारसायकल चोरीतील चोरट्यास अवघ्या १२ तासांच्या आत पकडण्यास शिरोळ पोलीस पथकास यश मिळाले आहे.सदर आरोपीकडुन गुन्हयातील मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
नांदणी गावी दि. २८/०८/२०२२ रोजी दुपारी १५.०० ते १८.०० रोजी नांदणी ते हरोलीस जाणाऱ्या रोडला रिलायन्स पेट्रोल पंपजवळ रस्त्याचे कडेला पार्क केलेली हिरो कंपनीची एच. एफ डिलक्स मोटर सायकल नं. एम.एच.०९ डी.जी. ५१८२ फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरुन नेलेबाबत फिर्याद दिली होती.
सदर गुन्हयाच्या तपासाबाबत पोलीस निरीक्षक मा. दत्तात्रय बोरिगिड्डे शिरोळ पोलीस ठाणे यांनी योग्य त्या सुचना देवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सांगीतले होते. त्याप्रमाणे सदर गुन्हयाबाबत अवघ्या १२ तासाचे आत सखोल तपास करून गोपनीय बातमीदारमार्फत बातमी काढून सदर गुन्हयातील संशयीत इसम नामे वाहीद रहीमान पिंजारी उर्फ नदाफ व. व. २७, रा. गैबी पिराजवळ, नांदणी ता. शिरोळ याचा सदर गुन्हयात सहभाग असलेबाबत खात्री झालेने त्यास सापळा रचुन नांदणी माळभाग परीसरातुन शिताफीने ताब्यात घेतले. सदर गुन्हयाबाबत त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिली व चोरुन नेलेली हिरो कंपनीची एच. एफ डिलक्स मोटर सायकल नं. एम.एच.०९ डी. जी. ५१८२ किंमत २०,०००/- रुपयेचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपींना गुन्हयाच्या कामी अटक करण्यात आलेली असुन मा. कोर्टात हजर केले असता त्यास २ दिवस पोलीस कस्टडी देणेत आलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास २/१६६७ दिलीप कुंभार हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. रामेश्वर वैंजने उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग जयसिंगपूर पोलीस निरीक्षक मा.दत्तात्रय बोरीगिडडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बजरंग माने, पोलीस उपनिरीक्षक शहाजी बंडगर पोलीस अंमलदार दिलीप कुंभार, ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी, युवराज खरात या पथकाने केली आहे.
सदरच्या कामगिरीने शिरोळ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा