![]() |
धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय,सातारा |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा येथील बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने दि. २ व ३ सप्टेंबर रोजी बी. कॉम. बँक मॅनेजमेन्ट व एम. कॉम. बँक मॅनेजमेन्ट च्या विद्यार्थ्यांना स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्सेस (SPSS ) या सॉफ्टवेअर द्वारे डेटा अनॅलिसिस करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष हॅन्ड्स ऑन ट्रेनिंग प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना IBM SPSS सारखे प्रगत सॉफ्टवेअर हाताळण्याचे कौशल्य प्राप्त व्हावे तसेच त्यांना प्रगत सांख्यिकीय विश्लेषण करण्याचे तंत्र अवगत व्हावे याकरिता हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले होते.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यलयाचा बँक मॅनेजमेंट विभाग हा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयॊजन करून विद्यार्थ्यांना प्रगत माहिती व कौशल्ये देण्याचा प्रयत्न करत असून SPSS सारख्या प्रगत सॉफ्टवेअर चे प्रशिक्षण म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषण क्षमता आणि संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. आमच्या पिढीला SPSS चे प्रशिक्षण नोकरीत आल्यानंतर घ्यावे लागेल मात्र हे विद्यार्थी नशीबवान आहेत कि त्यांना असे प्रशिक्षण महाविद्यालयीन जीवनातच प्राप्त होत आहे कि ज्यामुळे हे विद्यार्थी भविष्यात उत्तम विश्लेषक आणि संशोधक म्हणून चमकतील असा विश्वास प्राचार्य डॉ बाळ कांबळे यांनी व्यक्त केला.
सदर प्रशिक्षणाकरिता पुणे येथील तज्ञ मार्गदर्शक डॉ. अतुल कोडगळ यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. त्यांनी विद्यार्थ्यंना SPSS मध्ये डेटा एंट्री, कोडिंग, क्लासिफिकेशन, चार्ट व ग्राफ मेकिंग, डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस, सेंट्रल टेंडन्सी, को-रिलेशन, रिग्रेशन सह हायपोथेसिस टेस्टिंग व इंटरप्रिटेशन इत्यादी बाबीचे प्रशिक्षण दिले. साताऱ्यातील डी. जी. कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत स्मार्ट आणि हुशार असून त्यांच्याकडे नवीन तंत्रज्ञान पटकन आत्मसात करण्याची क्षमता असल्याचे मत डॉ.अतुल कोडगळ यांनी व्यक्त केले.
बँक मॅनेजमेंट विभागातील विद्यार्थी या प्रशिक्षणाचा उपयोग बँकिंग तथ्य विश्लेषण आणि बँकिंग मधील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारे विश्लेषण करण्यासाठी करतील आणि येथून पुढील काळातही अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग आयॊजीत केले जातील असे मत बँक मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख डॉ.विजय कुंभार यांनी व्यक्त केले.
सदर प्रशिक्षण वर्गाचे समन्वयक प्रा.श्रीकांत गंगावणे, डॉ सुनील गोंड आणि प्रा. प्रतीक पोतेकर यांनी या उपक्रमाचे नेटके आयोजन करण्यामध्ये मौलिक योगदान दिले.
विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण शिबिरास मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या प्रशिक्षणाबद्दल समाधान ही व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा