Breaking

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

मातोश्री सोशल फाउंडेशन व छावा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमातून नांदणी येथे संपूर्ण आरोग्य तपासणी, मोफत उपचार व रक्तदान शिबिर संपन्न*


नांदणी येथे रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी


*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*


 नांदणी : मातोश्री सोशल फाउंडेशन कोथळी, छावा ग्रुप नांदणी व डी. वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कोल्हापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचा गणेशोत्सव देश हिताचा व एक दिवस आरोग्याच्या उस्तवाचा या अनोख्या उपक्रमातून नांदणी येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरास नागरिकांकडून उस्फुर्त असा  प्रतिसाद मिळाला. यावेळी अनेक रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावरती मोफत उपचार करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरामध्ये 35 रक्तदात्यांनी रक्तदान करून गणेश उत्सवानिमित्त गणपती बाप्पांच्या चरणी अनोखी अशी देणगी प्रदान  केली आहे. सदर शिबीराचा कार्यक्रमा मध्ये बोलतांना प्रा.आप्पासो भगाटे म्हणाले गणेशउत्सव यासारख्या लोक सहभागी सणांमध्ये अशा समाज बहुउपयोगी कार्यक्रमांची नितांत गरज आहे असे त्यांनी यावळी मत व्यक्त केले. तसेच नांदणी गावच्या प्रथम नागरिका सौ. संगीता तगारे यांनीही शिबीर आयोजकांचे आभार मानले.

    सदर शिबीरास महेश परीट डेप्युटी नांदणी, मातोश्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जीवन आवळे, उपाध्यक्ष अर्जुनसिंग राजपूत, ताराबाई आप्पासाहेब नरंदे हायस्कूलचा मुख्याध्यापिका प्रज्ञा देसाई, ग्रा.पं.स. विनायक कोळी, छावा अध्यक्ष ओंकार कोळी,  उपाध्यक्ष ऋषिकेश परीट, ग्रा.पं.स. दिलीप परीट, डॉ. वसंती पाटील वै.अधि. प्रा.आ. केंद्र, सुरेश गरड, मांतेश जुगळे, दादासो कोळी, राजगोडा पाटील, मातोश्री सोशल फाउंडेशन संचालित, शाहू आर्मीचे झहीरखान मोकाशी, अजय पाटील, संकेत गावडे, भोलू शर्मा, श्रुती यादव, आकांक्षा शिरोळकर, गौरव पाटील, डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे डॉ. सुनील, डॉ. सुशांत पाटोळे व  त्यांच्या टीम सह मंडळातील विविध सदस्य सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा