![]() |
मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. प्रभाकर माने, प्राचार्य प्रा.डॉ.अनिल पाटील व इतर मान्यवर घटक |
प्रा. डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक
इचलकरंजी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित, दत्ताजीराव कदम महाविद्यालय, इचलकरंजी येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन संपन्न झाला. या दिनाच्या औचित्याने शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मधील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. प्रभाकर माने यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या भाषणात डॉ. माने म्हणाले,"राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांमधून श्रमप्रतिष्ठा, सेवा, त्याग, नैतिकता, चारित्र्य, नेतृत्व संघटन, चिंतनशिलता, कलात्मकता व प्रयोगशीलता इ. गुणांबरोबरच संविधानाप्रती आदर वाढीस लागून राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करत देश बलशाली करावयाचे कार्य केले. देश बलशाली करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनासारखा दुसरा पर्याय नाही. जागतिक पटलावर युथ डेव्हलपमेंट इंडेक्स, वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स व वर्ल्ड युथ वेलबिईग इंडेक्समध्ये भारताचे स्थान उंचवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना एक उत्तम व सक्षम पर्याय आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय चारित्र्य, देशभक्ती , सामाजिक संवेदनशीलता, राष्ट्रीय एकात्मता व सेवा करण्याचा राष्ट्रभाव निर्माण होत असतो.
प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने प्रारंभ झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील होते. अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले,"विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास राष्ट्राच्या उन्नतीत फार मोठे योगदान देत असतो."
कार्यक्रमास सकाळ सत्राचे प्रमुख प्रा.डॉ. डी.सी. कांबळे, दुपार सत्राचे प्रमुख प्रा. डी. ए. यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. समारंभास राष्ट्रीय सेवा योजनाचे सदस्य प्रा. विशाल कांबळे व महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अरुण कटकोळे यांनी केले. आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. जे. मुंगारे यांनी केले. कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक , स्वयंसेवविकांचा उत्साहपूर्ण सहभाग लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी. के. वाघमारे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा