Breaking

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२

*डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांच्या पुस्तिकेचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन*


डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांच्या ग्रंथप्रकाशन करताना ऍड. प्रकाश आंबेडकर व अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


गडहिंग्लज : येथील ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ. ज्ञानराजा चिघळीकर व शिवाजी महाविद्यालय उदगीर येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एल. एच. पाटील यांनी लिहिलेल्या 'शेती आणि शेतकरी विषयक योजना व धोरणांची चिकित्सा' भाग एक या पुस्तिकेचे प्रकाशन अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथे करण्यात आले.

  सदर पुस्तिका रुपी पब्लिकेशन्स प्रा. लि. वतीने प्रकाशित केली गेली असून यावेळी डॉ. क्रांतीताई सावंत, प्रा. सोमनाथ साळुंखे, मा. अतुल बहुले, मा. सागर कांबळे, मा. दयानंद कांबळे, प्रा. विलास कांबळे, प्रा. आदिनाथ कांबळे यांचेसह फुले-आंबेडकर विद्वत सभेचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर पुस्तिकेचे लिखाण व प्रकाशन झाल्याबद्दल ओंकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. राजन पेडणेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा