![]() |
डॉ. जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये करियर मार्गदर्शन शिबिर |
*विक्रांत माळी : जयसिंगपूर प्रतिनिधी*
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे.मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे "करिअर मार्गदर्शन आणि अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया" यासंबंधी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहामध्ये शुक्रवार दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०४.०० वाजता तसेच बुधवार, दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०४.०० वाजता सांगली येथील दैवज्ञ समाज भवन मध्ये सदर मार्गदर्शन आयोजीत केले आहे, तरी सर्व इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनी व त्यांचे पालक यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे व प्र. प्राचार्या डॉ. एस. बी. पाटील यांनी केले आहे.
बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या करिअरच्या संधी व इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया - २०२२, अभियांत्रिकीच्या विविध शाखा, भविष्यातील नोकरीच्या संधी, उद्योग आणि उद्योजकतेमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी करावी लागणारे स्कील डेव्हलपमेंट, विद्यार्थ्यांना राज्य व केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्या, शासकीय नोकरीत उपलब्ध असणाऱ्या संधी, नवीन शैक्षणिक धोरण इत्यादी बाबींवर सविस्तर विवेचन व तज्ञांचे बहुमूल्य मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
डॉ. जे. जे. मगदूम महाविद्यालयाच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांपासून इंजिनिअरिंग शिक्षणाची गंगा अविरतपणे सुरू असून, सदर कार्यक्रमास महाविद्यालयातून शिक्षण घेऊन विविध पदांवर व उद्योजक म्हणून कार्यरत असलेल्या काही माजी विद्यार्थ्यांनाही आमंत्रित करण्यात आलेले आहे, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या संस्थेचे चेअरमन डॉ. श्री.विजय मगदूम, व्हा. चेअरपर्सन अॅड.डॉ.सौ. सोनाली मगदूम यांच्या प्रोत्साहाने डॉ.दादासो देसाई, डॉ.रवींद्र चौगुले, डॉ.प्रसाद कुलकर्णी, प्रा. सौ. पूजा बेळगली, प्रा. किरण घोडके करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा