Breaking

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

*संस्थेच्या वतीने समाजातील उच्च कोटीची कामगिरी करणाऱ्या रत्नांचा शोध व सन्मान ; पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचे प्रतिपादन*


प्रमुख पाहुणे मा. राजेंद्र मस्के, अध्यक्ष पत्रकार दगडू माने व संस्थापक अध्यक्ष एजाज मुजावरसह सर्व सत्कारमूर्ती

प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


जयसिंगपूर : जयसिंगपूरातील  सेवाभावी वृत्तीने काम करणारी नामांकित संस्था अर्थात स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्य कुशल व गुणवंत घटकांचा सन्मान व गौरव जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे कार्यशील पोलीस निरीक्षक मा. राजेंद्र मस्के, निर्भीड पत्रकार मा. दगडू माने यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे अध्यक्ष एजाज मुजावर व अन्य मानवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

     प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष एजाज मुजावर यांनी सर्व मान्यवर घटकांचे स्वागत केले. यानंतर निर्भीड पत्रकार रोहित जाधव यांनी संस्थेची विशेष माहिती देऊन कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.

सर्व मान्यवर सत्कारमूर्ती

      कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक मा. राजेंद्र मस्के यांनी सुरुवातीस संस्थेच्या गौरव उल्लेख करून संस्थेने वृद्धाश्रम, समाजातील वंचित घटक व रक्तदान उपक्रमाच्या माध्यमातून विशेष कामगिरी करावी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर एजाजभाई मुजावर व त्यांच्या टीमने केलेली विशेष कामगिरी वाखाण्याजोगी असल्याबाबत त्यांनी प्रतिपादन केले. स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या ४ था वर्धापन निमित्त  समाजातील विशेष किमया करणाऱ्या गुणवंत रत्नांचा शोध घेऊन तसेच  त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीचा सांगोपांग व नि:स्वार्थी भावनेने विचार करून त्यांचा गौरव करणे हे विशेष कौतुकास्पद आहे.

      कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते, संवेदनशील व्यक्तिमत्व व निर्भीड पत्रकार मा. दगडू माने अध्यक्षीय स्थानावर बोलताना म्हणाले, या संस्थेची कामगिरी समाधानकारक असून त्यांनी समाजातील वंचित घटकांचा सन्मान करून सामाजिकतेचे दर्शन घडविले आहे. ते पुढे म्हणाले, समाजातील काही घटकांकडून पुरस्काराच्या संदर्भात नकारात्मक चर्चा केली जाते याकडे दुर्लक्ष करून समाज परिवर्तन व सक्षम राष्ट्र घडवण्याचं काम या संस्थेने व पुरस्कार प्राप्त मानकरांनी करावे.

      शिवसेना शिरोळ तालुका प्रमुख मा.वैभवजी उगळे यांनी स्वराज्य बहुउद्देशीय सेवासंस्था व सत्कारमूर्तींचा उत्तम शब्दात कौतुक केले. यावेळी संभाजीपूर ग्रामपंचायत सदस्य मा. मनीषाताई पवार यांनीही संस्थेस शुभेच्छा देऊन गुणवंत सत्कारमूर्तींचे कौतुक केले.वजीर रेस्क्यू फोर्सचे संस्थापक अध्यक्ष मा.रऊफ पटेल यांनी समाधान व्यक्त केले.

     सर्व सन्माननीय सत्कारमूर्तींच्या वतीने प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी संस्थेने केलेल्या कामाचं गोड कौतुक करून संस्था व समाजाचे विशेष आभार व्यक्त केले.

      मा.सौ.रेखा गायकवाड यांनी उत्तम सूत्रसंचालन करून या कार्यक्रमाचे  आभार मानले. सदर कार्यक्रमास समाजातील मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      या अनोख्या समाजशील कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

1 टिप्पणी: