Breaking

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

जयसिंगपूर येथील डाॅ. जे.जे. मगदूम होमिओपॅथीक मेडीकल काॅलेज मार्फत राष्ट्रीय परिसवांदाचे आयोजन.


डॉ. जे.जे.मगदूम होमिओपॅथीक मेडिकल काॅलेज


भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी


जयसिंगपूर - येथील डाॅ. जे.जे. मगदूम होमिओपॅथीक मेडिकल काॅलेज, जयसिंगपूर मार्फत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मिरज येथील डाॅ. बजरंग भोसले यांचे  ” लिमीटलेस स्कोप आॅफ होमिओपॅथी “ या विषयावर रविवार दि. 09/10/2022 रोजी सहकार महर्शी शामराव पाटील यड्रावकर नाटयगृह , जयसिंगपूर येथे सकाळी 10 वाजले पासून संपन्न होणार आहे. त्यामध्ये महाविद्यालयाचे सर्व पदवी, पदव्युत्तर, आंतरवासिय विद्यार्थी व सर्व शिक्षकगण आणि रूग्णालयातील सर्व वैद्यकीय मंडळी उपस्थित राहणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आर.एन. कुलकर्णी यांच्या मार्फत करणेत आले.

डाॅ. जे.जे. मगदूम होमीओपॅथीक मेडिकल काॅलेजची स्थापना सन 1990 साली शिक्षण महर्षी स्व. डाॅ. जे.जे. मगदूम व स्व. डाॅ. प्रभा जे. मगदूम यांनी केली असून तेव्हा पासून महाविद्यालय उत्तरोत्तर प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत संस्थेचे अध्यक्ष डाॅ. विजय मगदूम व उपाध्यक्षा अॅड.डॉ.सौ. सोनाली मगदूम यांचे मार्ग दर्शनाखाली सदर महाविद्यालय प्रगतीपथावर आहे.

सदरहु कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डाॅ. विजय मगदूम व उपाध्यक्षा अॅड. डॉ. सौ. सोनाली मगदूम यांचे मार्गदर्षनाखाली प्राचार्य डाॅ. आर.एन. कुलकर्णी, उपप्राचार्या डाॅ.सौ. गझाला सय्यद परीसंवाद समितीचे प्रमुख डाॅ. रविंद्र चौगुले व इतर सदस्य हे या परिसवांदाचे नियोजनासाठीचे कार्य करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा