![]() |
संशयित आरोपी बसप्पा करलट्टी |
प्रविणकुमार माने : उपसंपादक
जयसिंगपूर : इचलकरंजी येथील पीडित विद्यार्थिनींना दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिसांनी जयसिंगपूरातील खाजगी क्लासच्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. संशयित आरोपी बसप्पा विठ्ठल करलट्टी वय ३५ राहणार सहावी गल्ली राजीव गांधीनगर दुर्गा माता मंदिरासमोर असे आहे.
पोलीस सूत्राकडून दिलेल्या माहितीनुसार, बसप्पा विठ्ठल करलट्टी हा खाजगी क्लासचा शिक्षक असून फिर्यादी विद्यार्थिनी २० वर्षीय असून ती इचलकरंजी येथे राहते. ऑक्टोबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत जयसिंगपूर येथील काडगे मळ्यात कळंत्रे यांच्या घरी बसप्पा करलट्टी राहत असलेल्या खोलीत आणि मगदूम बिल्डिंग तळमजलेच्या गाळ्यात बसप्पा करलट्टी याने पीडित मुलीवर बळजबरीने व वारंवार शारीरिक संबंध ठेवले असल्याची फिर्याद पीडित तरुणीने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिसांनी बसप्पा विठ्ठल करलट्टी याच्या विरुद्ध भारतीय कलम दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी खासगी शिक्षक बसप्पा विठ्ठल करलट्टी यास ताब्यात घेतले आहे.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहल टकले करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा