Breaking

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

*मा.भवानीसिंग घोरपडे सरकार यांच्याकडून माजी सुभेदार केंदबा कांबळे यांचा सत्कार*


भावनीसिंग घोरपडे सरकार व अन्य


टाकळीवाडी : नामदेव निर्मळे


टाकळीवाडी : शिरोळ तालुक्यातील  येथील माजी सुभेदार केंदबा कांबळे यांची नुकतीच महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती मा.भवानीसिंग घोरपडे सरकार यांच्याकडून सत्कार करण्यात आला. 

    भवानीसिंग  घोरपडे सरकार बोलताना  म्हणाले की, टाकळीवाडी गावाने आज कौतुकापद निर्णय घेतलेला आहे.माजी सैनिकांना एक संधी उपलब्ध करून दिली आहे.सैनिक निस्वार्थपणे व प्रामाणिकपणाने आपले काम करतात.

     मुलांना सैनिकी ट्रेनिंग देऊन सेनेमध्ये भरती होण्यासाठी प्रेरित करा, गावातील तालमीसाठी अनुदान मिळवून देऊ, जिम तयार करू असे आश्वासन दिले . 

   तसेच गावाने तंटा मुक्त अध्यक्ष पदासाठी माजी सैनिकांची निवड करून खूप चांगले कार्य केले आहे. सैनिक हाप्रामाणिक, शांत व निर्भिड एकवचनी असतो, सैनिकांसाठी आम्ही सदैव सेवेसाठी तत्पर आहे.

    केंदबा कांबळे यांचे वडील श्रीकांत कांबळे हे एक माजी सैनिक होते. त्यांनी सुद्धा देश सेवा करून समाजकार्य केले होते.त्यांचाच वसा श्री केंदबा कांबळे हे पुढे घेऊन जात आहेत.

   यावेळी ऑर्डीनरी कॅप्टन रमेश निर्मळे, दादा खोत,  संजय बदामे, मोहन निर्मळे ,गोपाल निर्मळे, व गावातील सर्व माजी सैनिक होते. तसेच गावातील सरपंच मंगल बिरणगे उपसरपंच बाजीराव गोरे अनिल कांबळे, विनायक कांबळे, आनंद उन्हाळे,  हे उपस्थिती होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा