Breaking

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

खोची: भरवस्तीत आली मगर. छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनने केले मगरीला रेस्कु

संग्रहित छायाचित्र 


मालोजीराव माने कार्यकारी संपादक

      खोची :  बुधवार दिनांक १९,  रोजी खोची, ता. हातकणंगले येथील चव्हाण गल्ली येथे आढळलेल्या मगरीला छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशन'ने वनविभागाच्या साहाय्याने रेस्कू करून नैसर्गिक अधिवासात सोडले.


       खोची गावच्या मध्यभागी असलेल्या तलावात काही दिवसांपासून ही मगर दिसत होती. परंतु गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे या तलावाचे पाणी काठोकाठ भरल्याने ही मगर ऊन खाण्यासाठी तसेच अन्नाच्या शोधात तलावातून बाहेर पडल्याच्या अंदाज आहे. व अन्नाच्या शोधात रात्री चव्हाण गल्ली या मानवी वस्तीत पोहोचली. रात्री सुमारे दोनच्या दरम्यान घराबाहेर काहीतरी वाजल्याचे जाणवत असल्याने बाहेर येवून पाहता तिथे मगर दिसून आली. तेव्हा गावकऱ्यांनी छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन शी संपर्क साधला. सेवेचे ठायी तत्पर हे या ध्येयाने प्रेरित झालेल्या सदस्यांनी रात्रीचे दोन वाजता अवघ्या वीस मिनिटात घटनास्थळी दाखल होऊन मगर रेस्कु केली आणि तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.


      याआधी २०१९ पासून या तलावात मगरी आढळत होत्या, परंतु त्यांच्यापासून कोणतीच हानी झाली नव्हती, तसेच वनविभाग व छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनने वेळोवेळी प्रबोधन केल्याने गावकऱ्यांनीही त्यांचे सहअस्तित्वात राहणे मान्य केले होते. परंतु भविष्यातील धोका ओळखून त्या मगरीना मूळ अधिवासात सोडण्यात आले होते.


       या बचाव कार्यात छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशन संस्थेचे सदस्य तेजस जाधव , अमर चव्हाण , अमोल सुतार , अक्षय मगदूम , गणेश नंदेश्वर , सचिन निकम , राकेश शिखरे होते. तसेच या बचाव कार्य करवीर वनक्षेत्रपाल रमेश कांबळे,  वनपाल साताप्पा जाधव यांच्या देखरेखीखाली पार पडले. सोबतच छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन चे संस्थापक यौवराज महाराज शहाजीराजे छत्रपती यांचेही मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा