![]() |
सांगलीतील प्रसिद्ध लेखक व अर्थ विचारवंत प्रा.संजय ठगळे |
* प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सांगली : भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संजय ठिगळे यांना मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने देण्यातयेणारा वृत्तपत्रातील अर्थविषयक लेखनासाठीचा प्रा.सौ.अरुणा रारावीकर पुरस्कार जाहीर झाला असून प्रा.ठिगळे यांच्या 'चौकटीबाहेरच्या निर्णयांची गरज' या लेखाची दखल घेऊन मराठी अर्थशास्त्र परिषदेने सदरचा पुरस्कार जाहीर केला आहे.
सदरचा पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम ७ नोव्हेंबर २०२२ रोजी जालना येथे मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वार्षिक अधिवेशनात होणार आहे.
पुरस्कारप्राप्त झाल्याबद्दल भावना व्यक्त करताना प्रा. ठिगळे म्हणाले की, अर्थशास्त्रासारखा अवघड विषय साध्या आणि सोप्या पद्धतीने वृत्तपत्रीय लिखाणाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांसाठी लिहीत गेलो त्याची पोहाचपावती म्हणजे हा पुरस्कार आहे.पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. डॉ विश्वजीत कदम,भारती विद्यापीठाचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, प्राचार्य डॉ व्ही. वाय. कदम त्याचबरोबर साहित्यिक मित्रांनी प्रा ठिगळे यांचे अभिनंदन केले आहे.
सांगली जिल्ह्यातील अर्थशास्त्र विषयातील गाढे अभ्यासक, शीघ्र कवी, लेखक, विचारवंत व सामाजिक चळवळीतील अग्रगण्य सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. बदलत्या जागतिक व राष्ट्रीय आर्थिक परिस्थितीला अनुसरून त्यांची अर्थविषयक लेखणी तळपळत असते. राज्य पातळीवरील विविध पदावर ते कार्यरत असून अत्यंत शांत, संयमी व समाजासाठी भूषणावह व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत.
त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने अर्थप्रेमी व विविध घटकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा