![]() |
विद्यार्थी जनजागृती करताना |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बी. कॉम भाग २ मधील बँकिंग व बी. कॉम बँक मॅनेजमेंट या विषयाच्या विद्यार्थ्यांनी ३ सप्टेम्बर २०२२ ते १२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत परिसरातील नागरिकांमध्ये चलनी नोटांची माहिती देण्याबाबतचे विशेष अभियान राबवले असून या विद्यार्थ्यांनी सातारा तालुक्यातील विविध गावामधील २००० पेक्षा अधिक नागरिकांना खरी व खोटी चलनी न कशी ओळखावी यांची माहिती दिली. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या बाबींची माहिती समाजातील नागरिकांना देखील आवश्यक असून अलीकडील काळात बोगस चलनी नोटांचे प्रमाण वाढत असून अल्पशिक्षित व अशिक्षित लोक अशा नोटा व्यवस्थितपणे ओळखू शकत नाहीत त्यामुळे अनेक वेळा त्यांची फसवणूक होते. ही फसवणूक होऊ नये यासाठी सामान्य नागरिकांना या नोटा ओळखता याव्यात यासाठी खऱ्या नोटांची वैशिष्ट्ये आणि सुरक्षा चिन्हे याची माहिती देण्याचे अभियान राबवले आहे.
![]() |
विद्यार्थी जनजागृती करताना |
भारतीय रिजर्व्ह बँकेच्या अहवालानुसार सन २०२०-२१ मध्ये देशात २ लाख ८ हजार इतक्या बोगस नोटा सापडल्या होत्या तर सन २०२१-२२ मध्ये २ लाख ३० हजार इतक्या बोगस नोटा सापडल्या आहेत. सद्या देशात मोठ्या प्रमाणात बोगस नोटा चलनात येत आहेत त्यामुळे सामान्य जनतेची फसवणूक होत आहे. या नोटांमध्ये विशेषतः २००, ५००, आणि २००० च्या नोटांचे प्रमाण असत असल्याचे दिसून येत आहे. सन २०२१-२२ मध्ये केवळ २००० रुपयांच्या २ कोटी ७२ लाख रुपयांच्या तर ३ कोटी ९८ लाख रुपयांच्या बोगस नोटा सापडलेल्या आहेत. याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे ही बाब लक्षात आल्यामुळे एक सामाजिक जबाबदारी म्हणून महाविद्यालयाच्या बँक मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय कुंभार यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले असून या मध्ये महाविद्यालयाचे ३९० विद्यार्थी सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा