![]() |
संग्रहित छायाचित्र |
दानोळी : येथे बुधवारी नदी रोड परिसरात सांडपाण्याच्या नाल्यात असलेली चार फूट लांबीची मगर छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशन यांनी वन विभागासोबत रेस्कू केली. बुधवारी सकाळी नागरिकांना ही मगर दिसून आली होती. मगर पकडून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
गावात नागरी वस्तीच्या शेजारी मगर असल्याचे कळताच पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांनी वनविभागाशी संपर्क साधला. तात्काळ वनविभाग छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन सोबत घटनास्थळी दाखल झाली. भर पावसात मगर पकडण्यासाठी वन विभाग व प्राणीमित्रांची सुमारे चार तास धडपड सुरू होती. चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे नाल्याला आलेल्या पाण्यामुळे मगर पकडणे कठीण जात होते, परंतु ग्रामपंचायतने जेसीबी मागवून पाणी अडवल्याने मगर पकडणे सोपे झाले.
![]() |
वनविभाग, छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन चे सदस्य आणि ग्रामस्थ |
यावेळी वनरक्षक अरुण खामकर, छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन चे सदस्य प्रदीप सुतार, अक्षय मगदूम, तेजस जाधव, वनमजूर हरिभाऊ जाधव, माजी उपसरपंच सुनील शिंदे, रामचंद्र वाळकुंजे, वन विभाग कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
या रेस्कू ऑपरेशन मधे मुख्य वनसंरक्षक श्री आर.एम. रामानुजम सर, करवीर चे RFO श्री रमेश कांबळे आणि छत्रपती वाईल्ड लाईफ संस्थेचे संस्थापक यौवराज महाराज शहाजीराजे छत्रपती यांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा