![]() |
समस्त नागरिक व ग्राहकांना आवाहन |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर व्यापारी महासंघाचे समस्त नागरिक ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे की, ऑनलाइन खरेदी न करता प्रत्यक्षपणे स्थानिक दुकानदाराकडून वस्तू खरेदी करावेत.कुटुंबासमवेत बाहेर पडून वस्तू खरेदी करणे यामुळे कुटुंबाला व व्यापारी पेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
आजतागायत जयसिंगपूर व्यापारी महासंघाच्या सदस्यांनी अतीघाईच्या वेळी रात्री अपरात्री दुकान उघडून सेवा दिली. निस्वार्थी भावनेने आपल्या सुख दुखा:त सहभागी होऊन वेळे प्रसंगी मदतीला धावून आलेला आहे.कोरोनाच्या महामारीच्या काळात ऑनलाईन सेवा बंद असताना जीवाची पर्वा न करता ग्राहक हा राजा मानून प्रामाणिकपणे सेवा देणारा हाच स्थानिक व्यापारी वर्ग होता.
या निमित्ताने सर्व स्थानिक नागरिकांना व ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, ऑनलाइन खरेदी न करता स्थानिक व्यापारी वर्गाकडून वस्तू खरेदी करावेत. यामध्ये व्यापारी व ग्राहक या दोन्ही वर्गाचं हित आहे. मग चला पुन्हा एकदा आपलं गाव स्वयंपूर्ण करूया. स्थानिक व्यापारी वर्गाला प्राधान्य देऊया.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा