Breaking

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

*लोकचळवळ व परिपूर्ण व्यक्तिमत्त्वासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची गरज : माजी खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिपादन*


मार्गदर्शन करताना माजी खासदार मा.राजू शेट्टी व डॉ. महावीर अक्कोळे व अन्य मान्यवर


*प्रा. डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिवस व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे माजी खासदार मा.राजू शेट्टी व अध्य स्थानी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे उपस्थित होते.

     सुरुवातीस माजी खासदार मा.राजू शेट्टी यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना दिवसाच्या निमित्ताने एनएसएस झेंडाचे ध्वजारोहण करण्यात आले.

    विक्रांत माळी व टीमने देशभक्तीपर स्वागत गीताने या कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर मा.शेट्टी साहेब व डॉ. अक्कोळे यांच्या हस्ते जलार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी संस्थेचे सन्माननीय सदस्य मा.अशोक शिरगुप्पे व प्रा.आप्पासाहेब भगाटे उपस्थित होते.

    कॉलेजचे प्र.प्राचार्य डॉ.नितीश सावंत यांनी उपस्थित पाहुणे व मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकामध्ये या कार्यक्रमाचे आयोजनाचा राष्ट्रीय हेतू स्पष्ट केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रभाकर माने यांनी केले.

       माजी खासदार मा.राजू शेट्टी मार्गदर्शन करताना म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना खऱ्या अर्थाने समाज बदलून टाकणारी एक राष्ट्रीय संघटना आहे. माध्यमातून सामाजिक प्रश्न, समाज जाणून घेणे,समाजातील प्रत्येक उतरंडीचा अभ्यास, बिकट परिस्थितीत परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करणे होय. ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना पुरातन काळात आश्रमाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या ज्ञानाची व संस्काराचे बीजारोपण करणारी व्यवस्था आहे.तशीच व्यवस्था या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक व आत्मिक आनंद मिळत असतो. एनएसएसच्या माध्यमातून नेतृत्व गुण विकसित होऊन समाजाचे नेतृत्व करणाऱ्या तरुणांची फौज निर्माण होत असते.


     अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व समृद्ध होत असते.त्याचा फायदा समाजाच्या हितासाठी होत असतो. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून पुढे जाणे गरजेचे असते.


       यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच कार्यकाल पूर्ण ( दोन वर्ष) झालेल्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी विक्रांत माळी, सौरभ शेट्टी,ओंकार कोळी व शुभांगी ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त केली केली.

    या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. के.डी. खळदकर यांनी उत्तम पद्धतीने मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वप्नाली शेवाळे व साक्षी कंदले यांनी केले.

      या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रबोधन करणारी स्वागत कमान, ड्रिल मार्चिंग करीत पाहुण्यांचे स्वागत, ध्वजारोहण व प्रबोधनात्मक रांगोळी होती.

    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मेहबूब मुजावर,जीवन आवळे, विक्रांत माळी, भोलू शर्मा,नेहा राठोड, भाग्यश्री पाटील, तेजस राठोड,सत्यजीत माने, विवेक कांबळे, गौरव पाटील, ओंकार पाटील व अन्य स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी कार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा