![]() |
पद्मश्री पोपटराव पवार मार्गदर्शन करताना,प्र. कुलगुरू डॉ. पी.एस.पाटील व अन्य मान्यवर |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट या विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना पद्मश्री पोपटराव पवार यांनी देशातील गावे जोपर्यंत स्वावलंबी होत नाहीत, तोपर्यंत देश स्वावलंबी आणि समृद्ध होणार नसल्याचे प्रतिपादन केले. जातीपातीच्या पलीकडे जात गावात विविध योजना राबवत कामे केली तर गावात कितीही गटतट असले तरी ग्रामविकास साधता येतो, असेदेखील यावेळी पोपटराव पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी यावेळी बोलताना व्यसनाधीनता विषय, पर्यावरणविषयक, धार्मिक, शास्त्रीय, क्रीडाविषयक, ग्रामविकासाच्या विविध माध्यमांच्या विविध विषयांना अलगद स्पर्श केला.
कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत रा.से.यो. मधील स्वयंसेवकांचे ग्रामीण विकासामधील योगदान उपस्थितांना सांगितले. शेतीतील असणारे बदल, वसुंधरा वाचवण्यासाठी जलसंधारणाचे देखील महत्व त्यांनी यावेळी उपस्थित लोकांसमोर मांडले. या तरुण वयातील प्रेरणेला कृतीची गरज असल्याचे मत मांडताना तरुणाईतच जग बदलण्याची क्षमता आहे, त्यामुळे तरुणाईला योग्य दिशा दिली गेली तरी ग्रामविकास अन देशविकास साध्य असल्याचे मत यावेळी त्यांनी बोलताना मांडले.
यावेळी त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी हिवरेबाजार ग्रामविकासाचे चित्र उपस्थितांसमोर उभे केले अन उपस्थितांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू, प्रा. डॉ. पी. एस. पाटील हे होते. डॉ. नीलम जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाची प्रस्तावना यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट विभागाचे प्र. संचालक डॉ. नितीन माळी यांनी केली.सूत्रसंचालन समाजकार्य विभागाच्या सौरभ धनवडे यांनी केले. आभारप्रदर्शन संध्या कांबळे यांनी केले.
*येणारा काळ सचोटी अन कसोटीचा : मा. पोपटराव पवार*
पर्यावरणाची बदलती परिस्थिती आणि वसुंधरेचा होणारा -हास लक्षात घेता येत्या काळात बदल झाला नाही तर आपणाला या पृथ्वीचा नवीन भूगोल बघायला मिळण्याची शक्यतेची भिती पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा