Breaking

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

शिक्षकाच्या अंगी विविध कला असल्याच पाहिजेत ! - श्री.राहुल संबोधी

 

शिक्षक श्री. राहुल संबोधी 


      श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथे बी.एड च्या विद्यार्थ्यांसाठी  शिक्षणामध्ये कला या विषयावर शिक्षक श्री.राहुल संबोधी यांचे एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर पार पडले. यावेळी त्यांनी भावी शिक्षक होऊ घातलेल्या  विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

    यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना,  शिक्षक हा कलाकार असला पाहिजे. त्याच्या अंगी विविध कला असल्याच पाहिजेत,  असे प्रतिपादन श्री राहुल संबोधी यांनी केले. तुमच्याकडे तुमच्या विषयाच्या सखोल ज्ञानासोबतच विविध कला जसे की गायन, संगीत, नकला, जादूचे प्रयोग, जोक ई. असल्या पाहिजेत. आणि या वापरून जर तुम्ही शिकवलात तर विद्यार्थी आनंदाने आणि पूर्ण लक्ष देवून शिकतो. सोबत तुम्हालाही दरवेळी तोच तोच घटक शिकवताना कंटाळा येणार नाही. यासाठी सखोल व वैविध्यपूर्ण वाचन करा आणि किमान एखादी तरी कला अवगत करा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

       श्री. राहुल संबोधी हे सांगली शिक्षण संस्थेच्या हि.हा.रा. चि. पटवर्धन हायस्कूल येथे उपप्राचार्य म्हणून काम पाहतात. कलाक्षेत्रात त्यांची विशेष रुची आहे.  ते झी.मराठी वरील हास्यसम्राट या कार्यक्रमात विनोदवीर म्हणून सहभागी होते. त्यांनी विविध विनोदी नाट्य लिहिली आहेत. बोलक्या बाहुल्यांचा खेळ, कटपुतली, जादूचे प्रयोग असे कार्यक्रम ते महाराष्ट्रभर करत असतात. महाराष्ट्रात मोजकेच असे कलाकार आहेत ज्यांना बोलक्या बाहुल्यांच्या खेळाची कला अवगत आहे. ज्यामधे त्यांचे सुपुत्र श्री सम्यक संबोधी सुद्धा आहेत. सांगली जिल्ह्यात संबोधी पिता-पुत्र हे दोघेच हा बोलक्या बाहुल्यांच्या खेळाचे कलाकार आहेत.


प्राचार्य डॉ बी.पी. मरजे मार्गदर्शक श्री संबोधी यांचे स्वागत करताना 

     कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजचे माननीय प्राचार्य डॉ बी. पी. मरजे यांनी केले होते. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. श्रीमती वैशाली गायकवाड तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.पी. मरजे होते. 

      यावेळी ज्येष्ठ प्राध्यापक प्रो. डॉ. सुशील कुमार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.युवराज पवार, प्रो.डॉ.नवनाथ इंदलकर, प्रा.दयानंद बोंदर, प्रा.गायत्री जाधव, प्रा.मुक्ता पाटील आणि बी.एड प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा