Breaking

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

*जयसिंगपूरच्या अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेकडून सभासदांना १२% दराने भरीव डिव्हिडंड प्रदान*

 

लाभांश वाटप करताना अध्यक्ष प्रा.के.बी.पाटील,प्रा.पी.सी.पाटील,प्रा.मिश्रिकोटकर व संस्थापक डॉ.सुभाष अडदंडे


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर यांचेकडून सभासदांना 12% व्याजदराने लाभांश वितरित करण्यात आले.यावेळी पतसंस्थेचे संस्थापक व स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे उपस्थित होते.

    अनेकांत नागरी सहकारी पतसंस्था ही सातत्याने सभासदांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हितार्थ काम करीत असते. तसेच संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. पतसंस्थेची संवेदनशील पार्श्वभूमी व आर्थिक प्रगती पाहता सदर संस्था ही शिरोळ तालुक्यात नावारुपास आलेली आहे. 

   पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा.के.बी.पाटील व उपाध्यक्ष प्रा. पी.सी.पाटील व प्रा. आर.एम.मिश्रीकोटकर,  यांचे हस्ते पतसंस्थेच्या सभासदांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांश वाटप करण्यात आले.यावेळी प्रा.के.बी.पाटील यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगती बाबत माहिती देऊन संचालक मंडळ व सर्व सभासदांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

      यावेळी पतसंस्थेचे सभासद प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी संस्थेच्या सभासद हितार्थ कार्याबद्दल व गेल्या वर्षी पेक्षा १% अधिक वाढीव लाभांश दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

      यावेळी सदर लाभांश वाटप कार्यक्रमास पतसंस्थेचे संचालक प्रा.डॉ. सौ.व्ही. व्ही. चौगुले, प्रा.सौ.एम.एस.पाटील, मा.सुहास हिरुकडे, मा.सुनील कणसे, मा.हिरालाल पवार उपस्थित होते.

    यावेळी प्रा.ए.के.इसराना,प्रा. डॉ. एन.एल.कदम,प्रा.डॉ. टी.जी.घाटगे,प्रा. एम.ए.शिंगे,प्रा.बी.ए.पाटील,प्रा.डॉ. प्रभाकर माने,बाहुबली भनाजे व सुभाष ठोमके व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

     पतसंस्थेचे कार्यशील व्यवस्थापक राहुल पाटील व कॅशियर सुधाकर पाटील यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.

     दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पतसंस्थेने 12% व्याजदराने लाभांश देऊन सभासदांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा काम केले असल्या बाबतची सकारात्मक प्रतिक्रिया सभासदांकडून मिळत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा