![]() |
मार्गदर्शन करताना डॉ. एल.एन.घाटगे |
*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
सातारा : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा अर्थशास्त्र विभागाच्या वतीने "कला शाखेतील करिअर संधी" या विषयावर प्रा. डॉ. एल. एन. घाटगे माजी उपप्राचार्य, धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय, सातारा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे साहेब उपस्थित होते.
प्रा. डॉ. एस. एम. भोसले यांनी या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या मान्यवर घटकांचे स्वागत करून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. एल.एन घाटगे यांनी 'कला शाखेतील करिअर संधी' या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला काय बनायचे आहे हे ठरवले पाहिजे. ध्येय बाळगून ते ध्येय पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात, एकविसाव्या शतकात टिकून राहण्यासाठी व नोकरीची संधी मिळवण्यासाठी इंग्रजी विषयाचे ज्ञान, सामान्य ज्ञान, संगणकाचे ज्ञान व विविध कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत असे प्रतिपादन केले. याचबरोबर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात घेतले जात असलेले विविध को आपीएस, एम्पीएससी यूपीएससी, शॉर्ट टर्म कोर्स, स्किल कोर्स, इंग्लिश स्पिकिंग कोर्स यामध्ये सहभागी झाले पाहिजे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध कौशल्य विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनात शिकली पाहिजेत. तरच त्यांना या स्पर्धात्मक युगात टिकून राहता येईल असे त्यांनी विशद केले.
ते पुढे म्हणाले,कला शाखेत नोकरीच्या कोणकोणत्या संधी आहेत हे सांगताना त्यांनी एमपीएससी, यूपीएससी अंतर्गत वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 ची पदे कोणती, त्याचा अभ्यासक्रम काय आहे. तसेच आयबीपीएस अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या प्रोबेशनरी ऑफिसर व क्लार्क पदासाठीचा अभ्यासक्रम त्यासाठी करावयाची तयारी याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शेतीला पूरक व्यवसाय सुरू केले पाहिजेत. यासाठी स्वयंरोजगाराची वाट चोखाळली पाहिजे. कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन व शेतीमध्ये आधुनिक प्रयोग केले पाहिजेत असे नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे साहेब यांनी विद्यार्थ्यांनी आयबीपीएस, एमपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी एफ वाय ला असतानाच केली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला काय करता येईल याचा विचार करून एक मनाशी ध्येय बाळगून त्या दिशेने प्रयत्न केले.पाहिजेत, असे प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतेच असे त्यांनी नमूद केले. गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळतातच हे त्यांनी उदाहरणासह सांगितले. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून नवनवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. असे त्यांनी आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनात सांगितले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डी. एस. एस. पवार , अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रकाश टोणे, डॉ. खामकर , प्रा. कवितके आणि प्रा. जगताप उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गजानन खामकर यांनी उत्तम पद्धतीने केले. आभार प्रा. अर्जुन जगताप यांनी मानले. या कार्यक्रमास ७१ विद्यार्थीनी तसेच अर्थशास्त्र विभागातील सर्व सहकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा