![]() |
प्रमुख वक्ते प्रा.दयानंद बोंदर सर |
![]() |
मध्यभागी मा.प्राचार्य बी.पी. मरजे , उजव्या बाजूस प्रमुख वक्ते प्रा.दयानंद बोंदर आणि डाव्या बाजूस ग्रंथपाल श्रीमती संध्या यादव |
सांगली : श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली येथे वाचन कट्टा आणि भाषा मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या वाचन प्रेरणा दिन आणि सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या निवडक कविता वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रंथालय विभागामार्फत ग्रंथप्रदर्शनही आयोजित केले होते.
या कार्यक्रमासाठी वाचन कशासाठी आणि कसे करावे यावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेजचेच मराठी विषयाचे प्राध्यापक श्री. दयानंद बोंदर हे लाभले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंह, अब्राहीम लिंकन अशा विविध महान व्यक्ती या फक्त वाचनामुळेच घडल्या असल्याचे नमूद केले.
शरीर शक्तिशाली बनवण्यासाठी जशी व्यायामाची गरज असते, त्याचप्रकारे मनाची शक्ती वाढवण्याचा व्यायाम म्हणजे वाचन होय. वाचन अशक्त मनाला सशक्त बनवतं.
वाचनाची किमया सांगताना श्री. बोंदर सांगतात की, वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढते, स्वतःची मते तयार होतात, तुम्ही चांगले वक्ते तसेच लेखक होऊ शकता, मनाची एकाग्रता वाढवून ताणतणावापासून दूर राहता येते, आणि एक आदर्श व्यक्तिमत्त्व घडवते.
एक भावणाप्रदान तसेच यशस्वी व्यक्ती होण्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारचे साहित्य वाचायला हवे ज्यामधे ग्रामीण साहित्य, उद्योग आधारित वाचन यांचा समावेश हवा. इतिहास आणि वर्तमानाचे वाचन करूनच आपण भविष्याचा वेध घेवू शकतो. वाचन प्रेरणा दिन हा दिन म्हणून साजरा न करता संस्कार म्हणून जतन करा, असा संदेशही त्यांनी दिला.
![]() |
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रतिमापूजन करताना श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेजचे सर्व प्राध्यापक |
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ.बी.पी. मरजे यांनी तंत्रज्ञान आधारित वाचनाची विश्वासाहर्ता शंभर टक्के नाही, त्यामुळे पुस्तकेच वाचली पाहिजेत. योग्य वाचन आणि त्याचे चिंतन केले तरच ते विचार आपण समाजापर्यंत नव्याने पोहोचवू शकतो, असे नमूद केले.
![]() |
ग्रंथपाल श्रीमती संध्या यादव |
कार्यक्रमासाठी कॉलेजचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रोफेसर डॉ.सुशील कुमार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.युवराज पवार, प्रा डॉ.नवनाथ इंदलकर, प्रा.गायत्री जाधव, प्रा.मुक्ता पाटील, प्रा.वैशाली गायकवाड, ग्रंथालय सहाय्यक श्री. नंदकुमार नार्वेकर, शिक्षकेतर कर्मचारी आणि बी.एड प्रथम वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा