![]() |
कु.सई निर्मळे हिचे उत्साहात स्वागत |
टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे
टाकळीवाडी : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी या गावातील ऑर्नरी कॅप्टन रमेश निर्मळे यांची नात कु. सई हिचे टाकळीवाडी गावामध्ये व घरी जल्लोष स्वागत करण्यात आले.
रमेश निर्मळे यांचे चिरंजीव श्री सोनू निर्मळे यांना पहिली कन्यारत्न प्राप्त झाले. अतिशय उत्साहाने त्यांनी मिठाई वाटली.दुःखी न होता त्यांचा उत्साह पाहून इतरांना देखील मुलींचा आदर करावा हे बघून नक्कीच वाटेल असे वातावरण होते. आनंदाने तिचे स्वागत केले.तिच्यावर फुलांचा वर्षाव झाला. आनंदाने अगदी घर फुलून गेले होते.
आज कुमारी सईला देखील आदराने सन्मानाने वागणूक मिळाली.मुलगा - मुलगी भेदभाव दिसून येत नव्हता. सदर कन्येचा जल्लोषात स्वागत पाहता निर्मळे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा