Breaking

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

*लग्नाचे आमिष दाखवून एका तृतीयपंथीवर अनैसर्गिक अत्याचार करून लाखोंची केली फसवणूक*


लग्नाच्या आमिष दाखवून अत्याचार व मारहाण


*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचारासह साडेतीन लाख रुपये घेऊन एका तृतीयपंथीची फसवणूक केल्याप्रकरणी हेरले (ता. हातकणंगले) येथील एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ऋषिकेश बबन परमाज असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्यासह अन्य अनोळखी दोघांविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात पीडिताने तक्रार दिली आहे.

    याबाबत पोलीस सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय तृतीयपंथी हा आई, वडील व लहान भावासह राहत आहे. संशयित ऋषिकेश याच्याशी ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने इच्छेविरुद्ध अनैसर्गिक संबंध ठेवले. यावेळी विश्वास संपादन करून व्यवसायासाठी साडेतीन लाख रुपये ऋषिकेश याने पीडिताकडून घेतले आहे. संशयित आरोपीने दागिनेही काढून घेतल्याचा आरोप करून संशयितासोबत अन्य दोन अनोळखी मित्रांनीही आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.सन २०१८ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ही घटना घडल्याचे पोलीस सूत्राकडून माहिती प्राप्त झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा