Breaking

रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

*शिवाजी विद्यापीठ अधिसभेसाठी २९० अर्ज, विद्यापरिषद शिक्षक प्रतिनिधीसाठी २७ अर्ज व अभ्यासमंडळांच्या निवडणुकीसाठी १८४ अर्ज दाखल*


शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ अन्वये विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकीसाठी सोमवार दि. १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख दि. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं. ५.०० पर्यंत होती. त्यासाठी खालीलप्रमाणे अर्ज प्राप्त झाले आहे.

      अधिसभा निवडणुकीसाठी ३९ प्रतिनिधींसाठी २९० अर्ज प्राप्त झाले आहेत. 

     अधिसभा निवडणुकीसाठी संस्था प्रतिनिधीच्या खुल्या प्रवर्गाच्या ४ जागांसाठी २२ अर्ज, महिला प्रतिनिधी एका जागेसाठी ३ अर्ज, अनुसुचित जमाती प्रतिनिधी एका जागेसाठी शून्य अर्ज प्राप्त झाले आहेत.

    प्राचार्य प्रतिनिधीच्या खुल्या प्रवर्गाच्या ५ जागांसाठी ९ अर्ज महिला प्रतिनिधी एका जागेसाठी १ अर्ज, अनुसूचित जाती प्रतिनिधी एका जागेसाठी तीन अर्ज, अनुसूचित जमाती प्रतिनिधी एका जागेसाठी शून्य अर्ज, भटक्या व विमुक्त जमाती प्रतिनिधी एका जागेसाठी एक अर्ज, इतर मागासवर्ग प्रतिनिधी एका जागेसाठी तीन अर्ज असे एकूण दहा जागांसाठी १७ अर्ज प्राप्त झाले आहेत. 

     महाविद्यालयीन शिक्षक प्रतिनिधींच्या खुल्या प्रवर्गाच्या पाच जागांसाठी २७ अर्ज, महिला प्रतिनिधी एका जागेसाठी ३ अर्ज, अनुसूचित जाती प्रतिनिधी एका जागेसाठी १५ अर्ज, अनुसूचित जमाती प्रतिनिधी एका जागेसाठी ३ अर्ज, भटक्या व विमुक्त जमाती प्रतिनिधी एका जागेसाठी ८ अर्ज, इतर मागासवर्ग प्रतिनिधी एका जागेसाठी तीन अर्ज, असे एकूण दहा जागांसाठी ५९ अर्ज प्राप्त झाले आहेत.

 नोंदणीकृत पदवीधर प्रतिनिधींच्या खुल्या प्रवर्गाच्या पाच जागांसाठी ९१ अर्ज, महिला प्रतिनिधी एका जागेसाठी १८ अर्ज, अनुसूचित जाती प्रतिनिधी एका जागेसाठी १५ अर्ज, अनुसूचित जमाती प्रतिनिधी एका जागेसाठी ५ अर्ज, भटक्या व विमुक्त जमाती प्रतिनिधी एका जागेसाठी १९ अर्ज, इतर मागासवर्ग प्रतिनिधी एका जागेसाठी १६ अर्ज, असे एकूण दहा जागांसाठी १६४ अर्ज प्राप्त झाले आहेत


विद्यापीठ शिक्षक प्रतिनिधींच्या खुल्या प्रवर्गाच्या एका जागेसाठी ११ अर्ज, महिला प्रतिनिधी एका जागेसाठी ८ अर्ज, अनुसूचित जमाती प्रतिनिधी एका जागेसाठी ६ अर्ज, असे एकूण तीन जागांसाठी २५ अर्ज प्राप्त झाले आहेत.


   विद्यापरिषद शिक्षक प्रतिनिधी निवडणुकीसाठीप्रतिनिधींसाठी २७ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या खुल्या जागेसाठी ५, तर अनुसूचित जमाती जागेसाठी २ अर्ज प्राप्त झाले आहेत. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या खुल्या महिला जागेसाठी २ तर भटक्या व विमुक्त जमाती जागेसाठी शून्य अर्ज प्राप्त झाले आहेत. मानव्यविद्या विद्याशाखेच्या खुल्या जागेसाठी ४ तर अनुसूचित जाती जागेसाठी ४ अर्ज प्राप्त झाले आहेत. आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या खुल्या जागेसाठी ९ तर इतर मागासवर्ग जागेसाठी १ अर्ज प्राप्त झाले आहेत.

    

३६ अभ्यासमंडळांवर प्रत्येकी ३ जागांसाठी एकूण १८४ अर्ज प्राप्त झाले आहेत. 

   अर्जांची छाननी सोमवार दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या वेळेनुसार होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा