Breaking

सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

*दत्तवाड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य सेवकांनी आश्रमातील निराधार ज्येष्ठ नागरिकांची केली आरोग्य तपासणी*


वरिष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करताना दत्तवाड मधील डॉक्टर व आरोग्य सेवक


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


अकिवाट : शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त साखर कारखान्यासमोर सद्गुरु बाळूमामा मंदिराजवळ असणाऱ्या श्रावण बाळ वृद्धाश्रमातील निराधार वरिष्ठ नागरिकांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून विचारपूस केली.

      आज सोमवार दिनांक १०/१०/२०२२ रोजी ग्रामीण रुग्णालय दत्तवाड मधील सर्व स्टॉप डॉ.इरफान नदाफ, डॉ.मानसी वसगडे डॉ.सुजाता भोसले, सिस्टर सौ.मुल्ला कवाडे मॅडम व फिरोज देसाई यांनी मानवतेच्या भावनेने आश्रमातील स्वच्छता,पिण्याच्या पाणी, अन्नधान्याची चौकशी करून त्यांनी अनाथ वृद्धांसाठी केलेल्या सोयी सुविधांचा कौतुक केलं. अशा प्रकारच्या सोयी सुविधा व खऱ्या अर्थाने वृद्धांची सेवा करणाऱ्या या वृद्धाश्रमा सारखे आश्रम प्रत्येक ठिकाणी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

    यावेळी जेष्ठ नागरिकांची महिला व पुरुष वयस्कर यांच्या आरोग्याची तपासणी करून रक्त तपासणी, बीपी चेक करणे,वजन व अनेक चाचण्या करण्यात आल्या. त्यांच्याबरोबर चार तास गप्पा गोष्टी करून त्यांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना लागणारे सर्व औषध गोळ्या मोफत वाटप करण्यात आल्या. तसेच यापुढेही अशाच प्रकारचा आरोग्य सेवा देण्याचं कार्य या आश्रमासाठी राहील अशा प्रकारचे त्यांनी आश्वासित केले.     

     यावेळी सर्व डॉक्टर बंधू भगिनींचे व आरोग्यसेविकेचे स्वागत संस्थेच्या संचालिका शोभाताई पानदारे यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते व आश्रमाचे संस्थापक सुरेश सासणे यांनी उपस्थित आमचे आभार मानले.

      हे सर्व पाहून आश्रमातील वृद्ध नागरिक भावनिक झाले होते. यावेळी त्यांनी देवाचे आभार मानले की, आमच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी देवानेच ह्यांना पाठवले काय असे म्हणून त्यांना आनंद अश्रू आवरेना. सर्व डॉक्टरांना व त्यांच्या कुटुंबांना आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा ही देण्यात आल्या. या ठिकाणी आनंदा अश्रू व भावनांचा बंध फुटलेला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा