Breaking

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

*मराठी भाषेमध्ये अनेक रोजगारांच्या संधी : प्रा. सुरेश शिंदे*


मार्गदर्शन करताना प्रा. सुरेश शिंदे समवेत प्र.प्राचार्य डॉ.डी.बी. कर्णिक


*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*

जयसिंगपूर : लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर येथे मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा व रोजगाराच्या संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजन करण्यात आले. बाबासाहेब चितळे महाविद्यालय, भिलवडीचे मराठी विभाग प्रमुख, प्रा. सुरेश शिंदे मराठी भाषेमध्ये अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

           कन्या महाविद्यालयात व्याख्यानामध्ये बोलताना प्रा. शिंदे यांनी मराठी भाषा व आजच्या काळातील महत्व विषयी इंटरनेट, व्हाॅटस्अॅप, फेसबुक व ट्विटरमधून आॅनलाईन साहित्याविषयी माहिती दिली तसेच भाषेमध्ये अनुवाद क्षेत्राविषयी सांगितले.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्र.प्राचार्य डॉ. डी. बी. कर्णिक यांनी आपली मातृभाषा मराठीच्या संवर्धनाविषयी जागृत व चिंता करणेविषयी सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख  प्रा. डॉ. प्रविण चंदनशिवे यांनी केले. आभार प्रा.कु. साजिदा आरवाडे यांनी मानले. प्रमुख उपस्थिती प्रा. सलिम मुजावर व प्रा. श्रुतिका लठ्ठे होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक  व बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा