![]() |
शाहूनगर मधील श्री महालक्ष्मी ऑनलाइन सर्विसेस या दुकानाचा उद्घाटन सोहळा मा.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते |
*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : शाहूनगर मध्ये नव्याने सुरू झालेल्या श्री महालक्ष्मी ऑनलाइन सर्व्हिसेस या दुकानांचा उद्घाटन सोहळा मा.श्री. संजय पाटील ( यड्रावकर ) माजी उपनगराध्यक्ष जयसिंगपूर नगरपरिषद, जयसिंगपूर यांच्या हस्ते झाला.
या उद्घाटन प्रसंगी मा. संजय पाटील म्हणाले, आजच्या आधुनिक काळामध्ये डिजिटलायझेसनला अर्थात ऑनलाईन व्यवहाराला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारची उत्तम सोय व लाभ श्री महालक्ष्मी ऑनलाइन सर्विसेस या दुकानाच्या माध्यमातून शाहूनगर वासियांना होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
माजी नगराध्यक्ष मा.श्री असलमभाई फरास, माजी नगरसेवक मा.महेश कलकुटगी,मा.श्री.बंडगर, मा.श्री अर्जुन देशमुख मा.श्री. राजू कलकुटगी या मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. शाहूनगर भागात श्री महालक्ष्मी ऑनलाईन सर्व्हिसेसच्या माध्यमातून ई-श्रमकार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मोबाईल रिचार्ज व डिश रिचार्ज, अर्जंट आयडेंटी फोटो प्रिंट,शॉपॲक्ट, कॅश विड्रॉल व मनी ट्रान्सफर, विज बिल भरणा, फोन बिल, आधार कार्ड प्रिंट, बस रेल्वे विमान तिकीट बुकिंग सुविधा, झेरॉक्स, कलर झेरॉक्स, लॅमिनेशन ,डॉक्युमेंट स्कॅनिंग करून पीडीएफ, सर्व प्रकारचे ऑनलाइन ऑफलाइन फॉर्म ई. सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या फर्मच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मा.बबलू नलवडे, डॉ. प्रसाद माने, श्री. प्रकाश घोडके, श्री. आनंदा पडूळकर, श्री पर्वते पाटील, श्री. सुभाष पाटील, श्री. राहुल काळूगुडे, श्री. प्रसाद सपकाळ, श्री. श्रीपती माळी, श्री. गुरुदेव माळी, श्री. प्रकाश माळी, श्री. सोमनाथ माळी श्री. अभय माळी श्री. आनंदराव माळी, श्री दत्तात्रय माळी, श्री. बाबासो माळी श्री. जयराज माळी, श्री युवराज माळी, श्री. नागराज माळी श्री. धर्मराज माळी, श्री वामन माळी, श्री प्रताप माळी, सर्वच माळी बंधू, शाहूनगर भागातील सर्व ग्रामस्थ मंडळी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नवीन ऑनलाइन सर्विसेस फार्मच्या माध्यमातून जयसिंगपूर- शाहूनगर वासियांना सर्व प्रकारच्या ऑनलाइन सेवेचा लाभ मिळणार असल्यामुळे तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा