![]() |
सचिन व अर्जुन तेंडुलकर श्री दत्त चरणी प्रार्थना करताना |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी : लाखो क्रिकेट प्रेमींचा क्रिकेटरुपी देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी दत्त दर्शनासाठी आपला मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यासह भेट दिली. अर्जुन ला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळण्यासाठी श्री दत्त चरणी प्रार्थना केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज पहाटे 4:45 वाजता सचिन तेंडुलकर व अर्जुन तेंडुलकर यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेल्या व श्री दत्त महाराजांची राजधानी असलेल्या दत्त मंदिरास दर्शनासाठी भेट दिली व दत्त चरणाचे रांगेतून दर्शन घेतले. दरम्यान त्यांचा मुलगा अर्जुन यांची गोव्यामध्ये असलेल्या क्रिकेटसाठी दत्ताचे आशीर्वाद मिळावेत यासाठी त्यांनी प्रार्थना केली. यावेळी सौरभ भोळे उपस्थित होते.
श्री दत्त पुजारी नवल खोंबारे यांनी श्री दत्त चरणी प्रार्थना करून तेंडुलकर यांना श्रीफळ व प्रसाद दिला.
Prtek batmiche Vedio pn takavet..
उत्तर द्याहटवा