Breaking

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

*जयसिंगपूरच्या जी.के.जी.घोडावत कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन*

 

घोडावत कन्या कॉलेज मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन

*प्रा. माधुरी कोळी  : विशेष प्रतिनिधी*

जयसिंगपूर  : लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगलीचे श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ व एकता दौडचे आयोजन एन.सी.सी., एन.एस.एस. व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले. यावेळी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  

    प्रमुख अतिथी प्रा. डॉ. प्रवीण चंदनशिवे सरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव व एकतेविषयी विचार व्यक्त केले.कन्या महाविद्यालयमध्ये दि. 31 ऑक्टोबर दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. एन.सी.सी. च्या वतीने राष्ट्रीय एकता दौड व  एकतेची शपथ याचे नियोजन लेफ्ट. पद्मजा पाटील यांनी केले. सांस्कृतिक व एन.एस. एस. विभागाच्या वतीने फोटोपूजन, व्याख्यान व एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यांचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. बी. एस.पाटील, एन.एस.एस. समन्वयक डॉ. गौतम ढाले व प्रा. डॉ. सौ. एम. आर. शिंदे यांनी केले. 

   या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, एन.सी.सी. कॅडेटस् व एन.एस.एस. विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा