![]() |
सुसंवाद बैठकीत विविध विषयावर चर्चा |
*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर शहर परिसरातील अनेक नवोदित शिक्षक वर्गाकडून त्यांच्या असंख्य प्रश्नाविषयी सुसंवाद साधण्यासाठी नवशिक्षक सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख पाहुणे मा.प्रा.सौ.स्मिता कोरे , प्रमुख वक्ते मा.रवि चव्हाण व या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री.राहुल घाटगे सर लाभले होते.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते रवी चव्हाण यांनी यथोचित मार्गदर्शन करून अनेक प्रश्न सुसंवादातून साधण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी स्मिता कोरे मॅडम यांचेही सखोल मार्गदर्शन लाभले.
सदरच्या कार्यक्रमामध्ये शिक्षकांच्या विविध विषयावर चर्चा झाली, जे उद्याचे भावी शिक्षक आहेत त्यांना विविध प्रश्न विचारले, आणि त्या प्रश्नाचे उत्तर देवून त्यांच्या शंकेचे समाधान करण्यात आले. शिक्षकांची TET परिक्षा यावर चर्चा झाली पेपर-१ व पेपर-2 कोणता दिलेला चांगला त्याचा अभ्यासक्रम कोणता असतो, CTET दिलेली चांगली का? त्याचा अभ्यासक्रम कसा असता था वर सुसंवाद झाला.
त्याचा बरोबर NET, SET परीक्षा देण्यासाठी कोणती पात्रता लागते, त्याचा अभ्यासक्रम काय? त्याच बरोबर Ph.D ची प्रवेश परीक्षा देताना त्याचा अभ्यासक्रमावर आणि शिक्षक भरती विषयी सांगोपांग चर्चा झाली. म.न.पा, न.पा व जिल्हा परिषद यांच्या त्यामध्ये भरती विषयी सुसंवाद झाला.शिक्षक सुशिक्षित बेरोजगार शिक्षक यांना भत्ता मिळाला पाहिजे. अशा असंख्य विषयाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण चर्चा संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे राहुल घाटगे यांनी संवादातून सुसंवाद व सुसंवादातून प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.त्याचप्रमाण बदलत्या काळाप्रमाणे शिक्षकाने अपडेट राहिले पाहिजे, तरच तो या स्पर्धामध्ये टिकू शकतो आणि सरकारने शिक्षकांना अशैक्षणिक कामे देतात त्यावर चर्चा करून याला कार्यक्रमांची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य प्रा.डॉ. प्रभाकर माने , पत्रकार मा.इकबाल इनामदार , ज्ञानानंद महाराज मठ, सौ.संगिता भावसार यांचे सहकार्य मिळाले आणि उपस्थिता मध्ये विविध प्रश्न विचारण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार सौ.संगिता भावसार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक अनोख्या पद्धतीने प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न साध्य करण्यात आला. या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन राहुल घाटगे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा