Breaking

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०२२

*टेंभू योजनेमुळेच दुष्काळग्रस्त भाग विकासाच्या वाटेवर : डॉ. विलास बोदगिरे यांचे प्रतिपादन*

 

मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. विलास बोदगिरे व अन्य मान्यवर


*सुऐक चे बारावे व्याख्यान श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी मध्ये संपन्न*


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


सांगली : आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय मध्ये शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने आयोजित केलेलं *बारावे व्याख्यान* 3 ऑक्टोबर, 2022 रोजी संपन्न झाले.व्याख्याते डॉ. विलास बोदगिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मायणी यांनी  दुष्काळी भागातील पाणी प्रश्न आणि उपसा जलसिंचन योजना या विषयावर यथोचित मार्गदर्शन केले.

  डॉ. बोदगिरे मार्गदर्शन करताना म्हणाले, दुष्काळ हा मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आहे मानवनिर्मित दुष्काळावर मात करता येते मानवाने पहिल्यापासूनच दुष्काळ विरुद्ध लढा दिलेला आहे. आटपाडी हा भाग अवर्षणग्रस्त असून  या भागातील कायमस्वरूपी दुष्काळ आढळतो. या भागात वर्षानुवर्ष पिण्याच्या पाण्याची टंचाई व जनावराचा चाऱ्याचा प्रश्न सातत्याने संभवत असतो. सदर पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी टेंभू उपसा जलसिंचन योजना अत्यंत महत्त्वाची आहे. 1960 पासून कृष्णा नदीचे पाणी मानदेशाला मिळावे याविषयी आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनातूनच 1991 मध्ये नागनाथांना नायकवडी यांनी आटपाडीमध्ये पाणी परिषद घेण्यास सुरुवात केली. या पाणी परिषदेच्या माध्यमातून कृष्णा नदीचे पाणी आटपाडीला मिळावे या हेतूने आटपाडी मध्ये मोठ्या प्रमाणात चळवळी राबवल्या गेल्या. १९९५ मध्ये आटपाडीचे तत्कालीन आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी पाणी प्रश्नावरून युती सरकारला पाठिंबा दिला आणि आटपाडी व इतर तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी टेंभू उपसा जलसिंचन योजना मंजूर करून घेतली. राजेंद्र अण्णांच्या प्रयत्नामुळे टेंभू उपसा जलसिंचन योजना १९९६ मध्ये आटपाडीतील भवानी हायस्कूलच्या पटांगणावर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते सुरू झाली. या योजनेअंतर्गत सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील कराड,कडेगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमंकाळ, सांगोला व मंगळवेढा या सात तालुक्यातील सुमारे ८० हजार एकर शेतजमीन ही पाण्याखाली येणार आहे. सद्यस्थितीमध्ये २०१४ ला आटपाडी तालुक्यांमध्ये या योजनेचे पाणी आले या आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी आता उपलब्ध झाले आहे.१९७२ च्या दुष्काळामध्ये तत्कालीन सभापती कैलासवासी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी आटपाडी तालुक्यांमध्ये पाणी आडवा पाणी जिरवा मोहिम राबवली. या अंतर्गत संपूर्ण आटपाडी तालुक्यांमध्ये नऊ मोठे तलाव १५० पाझर  तलाव अनेक नाला बिल्डिंग बांधला त्यामुळे आज येणार टेंभुचे पाणी या तलावा मध्ये साठवता येऊ लागले.  टेंभूच्या पाण्याच्या साठवणीसाठी आवश्यक असणारे साठवण तलाव श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी १९७२ मध्ये निर्माण केले.आपण काळाच्या पुढे आहोत.आज कॅनॉलच्या माध्यमातून व बंदिस्त पाईपच्या माध्यमातून टेंभू योजनेचे पाणी संपूर्ण आटपाडी तालुक्यांमध्ये फिरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे सध्या आटपाडी तालुक्यात ऊस कापूस यासारख्या नगदी पिकांचे उत्पादन वाढू लागली आहे त्याचबरोबर दुग्ध उत्पादनामध्ये वाढ होऊ लागली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीमध्ये बदल होऊ लागला आहे. मात्र १९९५ ला सुरू झालेली योजना वीस वर्ष होऊन सुद्धा ही योजना पूर्ण झाली नाही विशेषता २००० नंतर विदर्भ मराठवाड्यातील अनुशेषामुळे टेंभू उपसा जलसिंचन योजनेला निधी मिळाला नाही. मात्र मानवतेचा विचार करता टेंभू योजना ही दुष्काळी भागातील असल्यामुळे या योजनेला अनुशेषातून वगळले जाणे आवश्यक आहे. दुष्काळी भागातील योजना म्हणून विशेष तरतूद करून या योजनेला जर निधी मिळाला तर टेंभू योजना खऱ्या अर्थाने पूर्ण होऊन दुष्काळी भागातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येईल.

   सदर व्याख्यानासाठी मार्गदर्शक प्राचार्य,डॉ.विजय लोंढे त्याचबरोबर मराठी अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.शिवाजी भोसले हे मान्यवर  उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुएकचे विद्यमान अध्यक्ष डॉ.राहुल शं. म्होपरे यांचा कार्यक्रमासाठीचा शुभेच्छा संदेश वाचून दाखवला. डॉ. ऋतुजा कुलकर्णी व प्रा. हणमंत सावंत यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.

     सुयेक संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या विशेष उपक्रमाचे तसेच आटपाडीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे उत्तम नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा