Breaking

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

*अर्थशास्त्र जगायला शिकवते : प्रा.डाॅ.अनिल सत्रे*


मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. अनिल सत्रे व डॉ. चंद्रकांत जाधव


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


वाळवा :  शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूर व क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय वाळवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुएक विशेष व्याख्यानमालेतील तेरावे पुष्प  स्पर्धा परीक्षेचे तज्ञ मार्गदर्शक प्रा.डॉ अनिल सत्रे यांच्यामार्फत गुंफण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डाॅ. हशिम वलांडकर होते. 

      सदर व्याख्यान "जागतिक  दारिद्र्य निर्मूलन दिनाचे" औचित्य साधून ठेवण्यात आले होते. दारिद्र्य निर्मूलन दिनाच्या निमित्ताने  बी.ए. व बी.काॅम. विभागाच्या् वतीने पोस्टर प्रदर्शनाचा उदघाटन समारंभ संपन्न झाला. तसेच डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस, वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या  निमित्ताने  वाळवा येथील  वृत्तपत्रे  विक्रेता अमोल माने यांचा सत्कार करण्यात आला. 


     डॉ.सत्रे यांनी आपल्या व्याख्यानात असे नमूद केले की, आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली असून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नवनवीन पोस्ट निघताहेत त्याचा लाभ विद्यार्थी-विद्यार्थीनी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ.सत्रे यांनी केले. जागतिक स्तरावर दारिद्र्य निर्मूलनाकडे सर्वच देशात प्रयत्न झाला पाहिजे यासाठी  हा दिवस साजरा केला जातो. शिक्षण व  दारिद्र्य यांच्यात अत्यंत जवळचा संबंध आहे असे मत डॉ.सत्रे यांनी मांडले.

     शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूरच्या  वतीने प्रा.डाॅ.चंद्रकांत जाधव यांनी मार्गदर्शन केले. शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूरचे विद्यमान अध्यक्ष डॉ. राहुल शं. म्होपरे यांचा कार्यक्रमासाठीचा शुभेच्छा संदेश डाॅ.आर.एम.लोंढे यांनी वाचुन दाखविला.

    या समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. राजा माळगी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ. हशिम वलांडकर हे होते.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.गोविंद ढोबळे यांनी मांडले.सदर समारंभ प्रसंगी डाॅ.ए.जे.शिंदे, डाॅ.बी.एस.माळी, प्रा.ए.आर.आंदोजी, प्रा.सतिश चौगुले व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थि-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा