Breaking

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

*शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या वतीने शिवाजी विद्यापीठासमोर धरणे आंदोलन*


शिवाजी विद्यापीठांसमोर सुटाचे धरणे आंदोलन

*प्रा. डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषद,अधिसभा ,विविध अधिकार मंडळेच्या  निवडणुकीचे पडघम वाजले असून याबाबतचा रीतसर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.मात्र सुटाने शिवाजी विद्यापीठ प्रशासनाच्या कारभाराविषयी शंका उपस्थित केली आहे. अधिसभेच्या शिक्षक मतदार यादीमध्ये विद्यापीठाने प्राचार्यांची नांवे बेकायदेशीरपणे समाविष्ट केली आहेत. वस्तुत: शिक्षक मतदार संघामध्ये महाविद्यालयीन प्राचार्यांना मतदार करण्याचा हक्क नाही. तरीही विद्यापीठाने त्यांची नांवे शिक्षक मतदार यादी मध्ये टाकली आहे. त्या संदर्भात मा. आपण रीतसर लेखी अपिल केले होते. पण मा. कुलगुरूंनी 'सुटा'चे अपिल फेटाळले आहे.त्याशिवाय काही शिक्षकाचे नांवे संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विद्यापीठाकडे सादर केली नाहीत त्या संबंधित प्राध्यापकांनी विद्यापीठाकडे तक्रार करूनही त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली नाही. वस्तुतः संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संबंधित शिक्षकांची नांवे पाठविण्याबाबत विद्यापीठाने आदेश देणे आवश्यक होते. विद्यापीठाच्या नाकर्तेपणामुळे त्या शिक्षकांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे.

  तसेच विद्यापीठाने महाविद्यालयातील १५२ विभाग प्रमुखाची नावे बेकायदेशीरपणे नाकारली आहेत. संबंधित विभाग प्रमुखांची नांवे प्राचार्यांनी विद्यापीठाकडे सादर केली होती. परंतू विद्यापीठाने विभाग प्रमुखांच्या मतदार यादी मध्ये त्या १५२ विभाग प्रमुखांची नांवे अंतर्भूत केली नाहीत. परिणामी त्यांचा मतदान हक्क डावलण्यात आला आहे. त्या विभाग प्रमुखांनी त्यांच्या वरील सदर अन्यायाविरूध्द आपणाकडे दाद मागीतली होती. परंतू आपण त्याचेही अपिल फेटाळले.त्या सर्व शिक्षकांचा व विभाग प्रमुखांचा लोकशाही अधिकार आपण नाकारला आहे. तरी आपल्या अन्यायी व बेकायदेशीर कृतीबद्दल आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. यासंबंधी सुटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आर. के.चव्हाण ,सुटा प्रमुख कार्यवाह डॉ.डी. एन. पाटील,सुटा खजिनदार डॉ. अरूण शिंदे,उपाध्यक्ष प्रा. डॉ. अरुण पाटील ,प्रा. ए. बी. पाटील, प्रा.डॉ. ईला जोगी यांच्या सह्या असलेले पत्र शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा.प्र.कुलगुरु प्रा.डॉ.पी.एस.पाटील यांना देण्यात आले.

      या आंदोलनास शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयातून शेकडो प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी विविध प्रकारच्या घोषणा देऊन शिवाजी विद्यापीठ परिसर दुमदुमून सोडला. याप्रसंगी सुटाचे अध्यक्ष मा.डॉ. आर.के.चव्हाण यांनी तीव्र शब्दात विद्यापीठ प्रशासनाविरोधी संताप व्यक्त केला.ते म्हणाले प्राध्यापकानो स्वतःच्या हक्कासाठी  व न्यायासाठी आता कंबर कसून ही लढाई जिंकायची आहे. हीच ती वेळ आहे.सुटा कोल्हापूर समन्वयक प्रा. सुधाकर मानकर यांनी प्राध्यापकांना प्रबोधित करीत असताना ते म्हणाले,सुटा ही नेहमीच प्राध्यापक हितार्थ कार्य करीत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व घटकांकडून विद्यापीठ प्रशासनाच्या नाकर्तेपणा व कारभाराविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

     यावेळी माजी शिक्षक आमदार मा.साळुंखे यांनी विद्यापीठ प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करून सुटाच्या या धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा