Breaking

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

*उचित ध्येय,उत्तम नियोजन व जिद्द- चिकाटीच्या जोरावर यशाची प्राप्ती :श्रीविनायक चौगुले यांचे प्रतिपादन*

 

मार्गदर्शन करताना मा.विनायक चौगुले

भोलू शर्मा  : विशेष प्रतिनिधी


कागल : डी. आर. माने महाविद्यालयात एन. सी. सी. विभागाच्या वतीने SSB व NDA Exam मार्गदर्शनपर व्याख्यान दि. १७/१०/२०२२ रोजी एन. सी. सी. विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्रीविनायक बाळासाहेब चौगुले (Flying Officer) यांचे SSB आणि NDA Exam ची तयारी कशी करावी या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. 

    यावेळी बोलताना त्यांनी आपण या परीक्षेसाठी कशी तयारी केली. याचे अनुभव कथन केले. या परीक्षांचे स्वरूप कसे असते. याची सविस्तर माहिती दिली. यामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणकोणते टप्पे असतात आणि मुलाखत देताना काय करायला पाहिजे, अभ्यास किती तास केला पाहिजे, मोजकाच पण चांगला अभ्यास करावा. नुसता पुस्तकी किडा न बनता सर्व क्षेत्राचे त्याला knowledge असले पाहिजे.  याबद्दल सखोल अशी माहिती दिली. त्यांचे व्याख्यान झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले त्याचीही उत्तरे दिली.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ओळख कॅप्टन डॉ. संतोष जेठिथोर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत एन. सी. सी. विभागाच्या कार्याचा आढावा घेऊन प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमाचे आभार माजी एन. सी. सी. कॅडेट अक्षय माळी यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट साक्षी माने व ऋतुजा शेवाळे यांनी केले. यावेळी शाहू हायस्कूल कागल व महाविद्यालयातील एन. सी. सी. कॅडेट मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे व्याख्यान आमच्या कॅडेटसना पुढील आयुष्याची दिशा देणारे ठरले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा