![]() |
महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साजरी करताना समाज बांधव |
टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे
सैनिक टाकळी : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथे महर्षी वाल्मिक ऋषी जयंती पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी केली. सैनिक टाकळीत (संभाजीनगर) कोळी मळा. येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळे, उपस्थित होते. महिला वर्गांचा मोठा सहभाग होता.
महर्षी वाल्मिक ऋषी यांचे आरती करून जयंती साजरी केली. यावेळी राजेंद्र गणपती कोळी यांनी महर्षी वाल्मिक ऋषी यांची मराठी भाषेत आरतीचे रूपांतर करून आरती म्हटले. यापूर्वी वाल्मिक ऋषी यांची आरती संस्कृत व इतर भाषेत होती. राजेंद्र कोळी यांनी मराठी भाषेत आरतीचे रेकॉर्डिंग करून आणले. गावातील नागरिकांनी महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. सालाबादप्रमाणे कोळी समाजाने महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती सैनिक टाकळी मध्ये मोठ्या उत्साहात पार पाडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा