![]() |
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रभाकर माने व इतर मान्यवर |
*प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
जयसिंगपूर : नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स,इचलकरंजी मध्ये अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत "New trends of digitalisation in Indian banking" या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. प्रभाकर माने व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ. पुरंधर नारे उपस्थित होते.
सुरुवातीस प्रा.डॉ.सौ.एस.ए.पौडमल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आजच्या आधुनिक तंत्रज्ञाच्या युगात बँकेचा डिजिटलायझेशनची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावी व या संदर्भातील ज्ञानसाधना आत्मसात करावी हा कार्यक्रम आयोजनाचा हेतू असल्याचा त्यांनी स्पष्ट केला. तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.शिवाजी रणदिवे यांनी अत्यंत उत्तम शैलीत पाहुण्यांचा परिचय करून दिला.
एकूण दोन सत्रात सदर कार्यशाळा संपन्न झाली. सुरुवातीस उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम सत्रात "भारतीय बँकिंग व्यवस्थेमधील महत्व व फायदे" या विषयावर जयसिंगपूर कॉलेजचे प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी सांगोपांग माहिती दिली. यामध्ये बँकिंग व्यवस्थेची पार्श्वभूमी, हिंदुस्थानातील बँक व्यवसायाची सुरुवात, पैशाचा इतिहास तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मध्ये अर्थात स्वातंत्र्योत्तर काळानंतर बँकिंग व्यवस्थेची स्थिती, 2014 नंतर मोदी सरकार च्या काळात डिजिटल क्रांतीचे स्वप्न, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि यूपीआय पेमेंट प्रणाली,ब्लॉग चेन,क्लाऊड बँकिंग व डिजिटल मार्केटिंग या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली. तसेच बदलत्या आर्थिक पर्यावरणात डिजिटल बँकिंगचे महत्व स्पष्ट केले. सद्य परिस्थितीला ग्राहकांची अपेक्षा आणि डिजिटल बँकिंग लोकप्रिय बनवण्या संदर्भातही सखोल माहिती दिली.तसेच प्रत्येक क्षेत्राची कार्यपद्धती कार्यक्षम करणे,पारदर्शी बनविणे, रोकडरहित व भ्रष्टाचार मुक्तव्यवस्था निर्माण करण्याबाबत ही आव्हान केले. देशाच्या डिजिटल क्रांतीचे व सर्वांगीण विकासाचे स्वप्न डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून साकार होणार असल्याचे ते म्हणाले. या सत्राचे आभार प्रा. डॉ. विरुपाक्ष खानाज यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात,मा.ए.व्ही.पुजारी यांनी "भारतीय बँकिंग मधील डिजिटलायझेशनच स्वरूप व प्रकार" याविषयी यथोचित्त मार्गदर्शन केले. यासाठी प्रात्यक्षिक स्वरूपातील काही उदाहरण देऊन व अनुभव कथन करून वास्तवता मांडली. या सत्राचे आभार प्रा.डॉ. शिवाजी रणदिवे यांनी मानले.
या कार्यक्रमास विविध महाविद्यालयातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेबाबत आपलं सकारात्मक मत व्यक्त करून या कार्यशाळेचे आयोजनाबाबत कौतुक केले. यानंतर पाहुणे व प्राचार्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
प्रा. डॉ. आर.एल.कोरे यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेमध्ये प्रा. डॉ.विजय देसाई,प्रा.डॉ. सौ.तेलसिंगे मॅडम,प्रा.डॉ.सौ.वैशाली शिंदे व अन्य प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये विषयाच्या अनुषंगाने संवाद-सुसंवाद निर्माण झाला. कार्यशाळेच्या उत्कृष्ट आयोजनाबाबत विद्यार्थी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा