Breaking

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०२२

*डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून ई-कॉमर्स ॲप विकसित*


नाविन्यपूर्ण कामगिरी करणारे विद्यार्थी


*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*


 जयसिंगपूर - येथील डॉ. जे. जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी  ई-कॉमर्स ॲप विकसित केले आहे. ग्राहक व उपभोक्ता त्याच्या वापराच्या व मागणीच्या गरजेचा अभ्यास करून या ऍपचा ऑनलाईन उपयोग करून खरेदीची निवड कमीत कमी वेळेत करू शकतो. उपभोक्त्याच्या पसंतीनुसार हवी असलेली वस्तू उपलब्धतेनुसार सर्व कंपन्यांची उत्पादने ग्राहकांसमोर आणण्याची व्यवस्था या ॲपद्वारे करण्यात आलेली आहे.

    इंटरनेटच्या जमान्यात लोकांच्याकडे असणारा  वेळ गृहपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी कमी पडू लागला आहे. त्यामुळे ग्राहक ऑनलाइन शॉपिंगकडे आकर्षित झाला आहे.तो आपणास हव्या त्या खरेदीसाठी पैसे व श्रम वाचवून चांगल्या गुणवत्तेची ची वस्तू उपलब्ध करून घेण्यासाठी अधिक महत्त्व देत आहे.

      सर्वसामान्य जनतेमध्ये ई - कॉमर्स चा वाढता वापर, घरच्या घरी वस्तू उपलब्ध करून घेणेचा वाढता फंडा, अचूकतेचा अभाव टाळण्यासाठी योग्य ग्राहकास योग्य वस्तू मिळवून देण्याचे  तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात आले आहे. मशीन लर्निंग या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून  कोलॅब्रेटिव्ह फिल्टरिंग सिस्टिमचा आधार घेऊन हा अँप बनविण्यात आला आहे,अशी माहिती संगणक विभागप्रमुख डॉ. सौ.डी. ए.निकम यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिश कुराडे, सादिया खान, मिसबाह इनामदार तसेच आकांक्षा कोले या विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यात यश मिळविले आहे.

 ई कॉमर्स मध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित करून ग्राहकांच्या पसंतीचे अँप बनवण्यात आमचे विद्यार्थी यशस्वी झाले.आजपर्यंतच्या तीस  वर्षाच्या शैक्षणिक कारकिर्दीत  महाविद्यालयने राष्ट्रीय पातळीवर पेटंट मिळालेले अनेक प्रोजेक्टस समाजास दिले आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्ट डॉ.सुनील आडमुठे व प्र.प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी दिली.संस्थेचे चेअरमन डॉ.विजय मगदूम व व्हाईस चेअरपर्सन ॲड.डॉ. सोनाली मगदूम यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा