![]() |
अनेकांत इंग्लिश स्कूलमध्ये बालदिन व बिरसा मुंडा जयंती साजरी |
*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 14 नोव्हेंबर या दिवसाचे औचित्य साधून मुलांचे आवडते नेते म्हणजे चाचा नेहरू यांची जयंती बालदिन व बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्याचप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे आदिवासी जननायक म्हणून ओळखले जाणारे बिरसा मुंडा यांच्याही प्रतिमेचे पूजन करण्यात आले. चाचा नेहरू व बिरसा मुंडा यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यानंतर लहान मुलांचे खेळ , गाणी ,भाषणे अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे आरबीएल उपक्रम देखील राबविण्यात आला.
कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा