![]() |
प्रा. डॉ. पी.एस.कांबळे, प्रा. डॉ. एस.एम.भोसले व प्रा. डॉ. ए.के.पाटील गुणवंत व आदर्श शिक्षक पुरस्कारानी सन्मानित |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा हिरक महोत्सव वर्धापन दिनी शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील गुणवंत प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जातो. यावर्षी अर्थशास्त्राचे प्रा. डॉ. पी.एस.कांबळे, प्रा. डॉ. एस.एम.भोसले व प्रा. डॉ. ए.के.पाटील गुणवंत व आदर्श शिक्षक पुरस्कारानी सन्मानित झाले.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते व विद्यापीठाचे कुलगुरू मा.प्रा.डॉ. डी.टी.शिर्के व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
शिवाजी विद्यापीठामार्फत दिल्या जाणाऱ्या संलग्नित महाविद्यालयातील गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी सावित्रीबाई फुले महाविद्यालय, सातारा येथील प्रा.डॉ. एस. एम. भोसले, शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर विभागातील Best Teacher Award साठी प्रा.डॉ.पी.एस.कांबळे यांना गौरविण्यात आले.तर कराडच्या एस.जी.एम. कॉलेजचे प्रा.डॉ. अण्णा काका पाटील यांची शिवाजी विद्यापीठामार्फत दिल्या जाणाऱ्या कै. बॅरिस्टर पी.जी.पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. प्रकाश कांबळे. डॉ. शिवाजीराव भोसले व डॉ. अण्णा पाटील यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे अर्थशास्त्रातील उच्च शैक्षणिक गुणवत्ता, उच्च कोटीचे संशोधनात्मक काम, अर्थशास्त्रातील विविध शैक्षणिक संघटनात्मक पदावर विराजमान, उत्कृष्ट लेखन कौशल्य, तल्लख बुद्धी, विचारांना कृतीची जोड, संस्कारक्षम व्यक्तिमत्त्वाची छटा, उत्तम वक्तृत्व, सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलता जपणारे, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, शैक्षणिक क्षेत्रात राजकारणापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देऊन विद्यार्थी प्राध्यापक व समाज घटकासाठी कठिबद्ध असणारे हे बहुश्रुत व्यक्तिमत्व होय.
जेष्ठ अर्थतज्ञ प्रा. डॉ. जे.एफ.पाटील व प्रा. डॉ. वसंतराव जुगळे या गुरुवर्यांच्या संस्कार व मार्गदर्शनाखाली परिपूर्ण तयार झालेले प्राध्यापक आहेत. या त्रयीनी सांगोपांग व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून अर्थशास्त्र विषयाची किंबहुना आपल्या प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाचा आदर्शाचा वस्तुपाठ समाज व अर्थशास्त्राच्या प्राध्यापका समोर ठेवला आहे. खऱ्या अर्थाने अर्थशास्त्र विषयाची उंची वाढवली आहे.
या पुरस्काराच्या निमित्ताने एक गोष्ट मात्र सत्य आहे की, एकाच विषयाचे तीन प्राध्यापक गुणवंत व आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित होतात हे शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासातील दुर्मिळ घटना किंवा इतिहास असू शकेल अशा प्रकारची चर्चा शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापकांच्या मध्ये आहे.अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आपला सार्थ अभिमान असल्याबाबतची प्रतिक्रिया अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांमधून उमटत आहे.
सुयेक व जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने या गुणवंत व आदर्शवादी प्राध्यापकांच्या व्यक्तिमत्वाला सलाम!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा