सांगली : शिवतेज करियर अकॅडमी सोनी पाटगाव येथे अॅनिमल वाईल्ड लाईफ प्रोटक्शन संस्थेतर्फे लोकनेते बाळासाहेब देसाई रेस्क्यु फोर्स, पाटण बचाव पथकाच्या स्वयंसेवकांना वन्यजीव सुरक्षा आणि सर्प प्रबोधन याचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅनिमल वाईल्ड लाईफ प्रोटक्शन संस्थेचे प्राणीमिञ विक्रम काटकर व राहुल घट्टे लाभले होते. या मार्गदर्शनात सापांची ओळख, सर्प अंधश्रद्धा आणि साप चावल्यानंतर करायचा प्रथमोपचार याबद्दल माहिती देण्यात आली.
साप हा नेहमीच आपला मित्र आहे परंतु अज्ञान आणि चुकीच्या अंधश्रद्धामुळे समाजात तो एक अपायकारक जीव असल्याचे मत तयार झाले आहे. योग्य काळजी घेवून आपणास सापांना वाचवण्याबरोबरच वैज्ञानिक माहितीच्या आधारे नागरिकांना माहिती देवून आपल्याला समाजातून या अंधश्रद्धा देखील कमी करायच्या आहेत, असे मत मार्गदर्शक श्री राहुल घट्टे यांनी व्यक्त केले.
या मार्गदर्शन शिबिरास श्रीकांत नलवडे, प्रदीप नाईक तसेच प्राणीमित्र देवेंद्र हलगे ,विकास चांदणे ,ओंकार कुंभार ,महेश वागणे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा