Breaking

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

*टाकळीवाडीत कडकडीत बंद ; सुळकुड योजना कोणत्याही परिस्थितीत कार्यन्वित होऊ नये*


सुळकुड पेयजल योजनेचा निषेध म्हणून टाकळीवाडी गाव बंद


टाकळीवाडी :-नामदेव निर्मळे


    टाकळीवाडी  : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी गावात (दूध गंगा नदी) योजना कोणत्याही परिस्थितीत कार्यन्वित होऊ नये ,यासाठी आज बुधवार दि. ९/११/२०२२ रोजी गावातील सर्व व्यवहार बंद करून १००% निषेध दर्शविण्यात आला.

     राजकीय पुढाऱ्यांनी स्वार्थासाठी व इचलकरंजी शहरातील मतदारांना भुलविण्यासाठी ही योजना आणली आहे. मुळात इचलकरंजी शहरालगत पंचगंगा नदी वाहत असताना प्रशासन व पुढाऱ्यांच्या अनास्था मुळे पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे. मात्र विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून इचलकरंजीतील नागरिकांना शुद्ध पेयजल व्यवस्था करण्याची आम्ही देत असतात. खरं म्हणजे पेयजल व्यवस्था करून नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याचा त्यांचा कायदेशीर व नैतिक अधिकार आहे. पण सुळकुड पेयजल योजनेच्या माध्यमातून दूधगंगा नदी किनारी असणाऱ्या गावातील शेतकरी व नागरिकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे प्रचंड प्रमाणात कायमस्वरूपी नुकसान होणार आहे. याचा विचार संबंधित घटकांनी केला नसल्याबाबत नागरिकाकडून बोललं जात आहे.

    याच पार्श्वभूमीवर दूधगंगा बचाव समिती यांच्याद्वारे संपूर्ण गाव बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सर्व गावकऱ्यांनी सुद्धा याला पाठिंबा दर्शवला आणि या योजनेला निषेध करीत व १०० % पाठिंबा देत टाकळीवाडीच्या गावकऱ्यांनी बंद यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

      शासनाने सुळकुड पेयजल योजनेचा पुन्हा एकदा विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी दूधगंधा बचाव समिती व नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा