जेष्ठ साहित्यिक आणि गझलकारा प्रा. सुनंदा पाटील यांच्या " कवितेचे कवडसे " या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक प्रियदर्शनी नाबर यांच्या अध्यक्षतेखाली , सामाजिक कार्यकर्त्या आणि साहित्यिक अंजना कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत , प्रतिथयश कथालेखिका गौरी गाडेकर यांच्या हस्ते "वसंत गॅलेक्सी " गोरेगाव मुंबई यांच्या हस्ते " आम्ही लेखिका या साहित्य संस्थेच्या वतीने दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी वसंत गॅलेक्सी गोरेगाव मुंबई येथे करण्यात आले. "कवितेचे कवडसे " या काव्यसंग्रहात सर्वत्र एक उत्तम कविता विखुरली आहे. हे पुस्तक काव्याच्या अभ्यासकांसाठी , सूत्रसंचालन कर्ते , निवेदन कर्ते , यासाठी अत्यंत उपयुक्त ठरावे . याप्रसंगी अध्यक्ष आणि गौरी गाडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले . यात एक सलग कविता असून , कवितेचे वेगवेगळे विभ्रम इथे बघायला मिळतात . काव्यसंग्रहाला जेष्ठ साहित्यिक डॉ. आरती कुलकर्णी नागपूर यांची प्रस्तावना लाभली असून , जेष्ठ विचारवंत श्री . प्रकाश एदलाबादकर नागपूर यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत .या प्रसंगी या पुस्तकाची जन्मकथा कवयित्री सुनंदा पाटील यांनी विशद केली . जयश्री चुरी ,पुष्पा कोल्हे , शिल्पा देवळेकर , सविता काळे , शोभा कुलकर्णी पूनम अरणकले , रेणूका पांचाळ यांनी या पुस्तकातील काही कवितांचे वाचन केले .
कार्यक्रमास आम्ही लेखिकाच्या दर्दी सदस्या बहुसंख्येने उपस्थित होत्या .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा